Fasting Papad: उपवासाचे बटाटा पापड, रेसिपी जाणून घ्या

प्रत्येक वर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथिला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी आठ मार्चला महाशिवरात्री येत आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकरांचा विवाह झाला होता. या व्रतासाठी बटाटा पापड तुम्ही करू शकतात. …

Fasting Papad: उपवासाचे बटाटा पापड, रेसिपी जाणून घ्या

प्रत्येक वर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी  तिथिला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी आठ मार्चला महाशिवरात्री येत आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकरांचा विवाह झाला होता. या व्रतासाठी बटाटा पापड तुम्ही करू शकतात. हे उपासाला चालणारे पापड महाशिवरात्री तसेच इतर उपासाला देखील चालतात. 

 

साहित्य-

एक किलो उकडलेले बटाटे 

सेंधव मीठ चवीनुसार 

1/2 छोटा चमचा काळी मीर पूड 

1/2 छोटा चमचा जीरे 

 

कृती-

उपासाला चालणारे बटाटा पापड बनवणे खूप सोपे आहे. या करिता एका बाउल मध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घेणे. मग यानंतर सेंधव मीठ, काळी मीरे पूड आणि जीरे टाकून हे मिश्रण चांगले मिक्स करा. मग कणकेच्या गोळ्याप्रमाणे तयार करून नंतर याचे छोटेछोटे गोळे तयार करा. या गोळ्यांना पापडच्या  मशीन मध्ये ठेऊन छोटे पापड तयार करून याला 2 ते 3 दिवस ऊन दाखवा. हे पापड वाळल्यानंतर तुपात तळून सर्व्ह करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik