नंदगड भागात चार दिवसात दोनवेळा शेतवडी तुडुंब
अतिपावसामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप
वार्ताहर /नंदगड
नंदगड, बेकवाड, हलशी परिसात गेल्या चार दिवसात दोनवेळा मोठा पाऊस झाला. त्यामुळे शेतवडीत व सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाण्यामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यावर्षी जून महिना सुरू होताच मंगळवार दि. 4 रोजी सकाळी या भागात मोठा पाऊस झाला. पावसामुळे शेतवडीत पाणी साचले होते. याच दिवशी पुन्हा दुपारनंतर प्रखर ऊन पडले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बुधवारी शेतवडीतील पाणी आटले होते. भाताच्या उगवणीसाठी व उगवलेल्या भाताला वाढीसाठी पाऊस पोषक ठरला होता. याच भागात गुरुवारी दुपारी तब्बल दोन तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पुन्हा शेतवडीत पाणी साचले आहे. पावसामुळे गटारीत साचलेली घाण व कचरा वाहून गेला आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Home महत्वाची बातमी नंदगड भागात चार दिवसात दोनवेळा शेतवडी तुडुंब
नंदगड भागात चार दिवसात दोनवेळा शेतवडी तुडुंब
अतिपावसामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप वार्ताहर /नंदगड नंदगड, बेकवाड, हलशी परिसात गेल्या चार दिवसात दोनवेळा मोठा पाऊस झाला. त्यामुळे शेतवडीत व सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाण्यामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यावर्षी जून महिना सुरू होताच मंगळवार दि. 4 रोजी सकाळी या भागात मोठा पाऊस झाला. पावसामुळे शेतवडीत पाणी साचले होते. याच दिवशी पुन्हा दुपारनंतर प्रखर ऊन पडले. […]