Maharashtra Budget 2026 कर्जमाफीवरून शेतकरी आक्रमक; उपमुख्यमंत्री फडणवीसांवर नाराज
शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, ‘महाराष्ट्र शेतकरी संघटनेने’ ही शुद्ध फसवणूक असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांचा ‘सातबारा कोरा’ (पूर्ण कर्जमाफी) करावा, या मागणीसाठी अनेक जिल्ह्यांत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
७ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील शेतकरी संघटना आणि विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहे.
शेतकरी आक्रमक होण्याची मुख्य कारणे
मर्यादित कर्जमाफी-सरकारने फक्त २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला माफी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या मते, खते, बी-बियाणे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज ५ ते १० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे २ लाखांची मर्यादा अत्यंत तोकडी असल्याची भावना आहे.
‘सातबारा कोरा’ करण्याची मागणी- शेतकरी संघटनांनी ‘संपूर्ण कर्जमुक्ती’ म्हणजे सातबारा कोरा करण्याची मागणी लावून धरली आहे. “तुकड्या-तुकड्यात कर्जमाफी नको,” असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे.
नियमित कर्जदारांची नाराजी-नियमित कर्ज भरणाऱ्यांना जाहीर केलेले ५०,००० चे प्रोत्साहनपर अनुदान अद्याप जुन्या योजनांचेही मिळालेले नाही, त्यामुळे या नवीन घोषणेवर शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाहीये.
ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलने- राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
“ही योजना म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली शुद्ध फसवणूक आहे,” अशी टीका करत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राजकीय वातावरण तापले
विरोधी पक्षाची भूमिका: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी “सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे,” असा आरोप केला.
ALSO READ: महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: काय स्वस्त आणि काय महाग? मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या, संपूर्ण यादी पहा
तसेच सरकारने म्हटले आहे की, राज्याच्या तिजोरीवर आधीच मोठा भार आहे, तरीही आम्ही ३५,००० कोटींची तरतूद करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
ALSO READ: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून राजकीय गोंधळ; विरोधक म्हणतात की हा फक्त आकड्यांचा आणि पोकळ आश्वासनांचा खेळ
Edited By- Dhanashri Naik
