शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणार

प्रतिनिधी / बेळगाव कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरू सेने यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकरी हुतात्मा दिन पाळणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी, याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. येत्या दि. 21 जुलै रोजी शेतकरी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी […]

शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणार

प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरू सेने यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकरी हुतात्मा दिन पाळणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी, याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
येत्या दि. 21 जुलै रोजी शेतकरी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या पार्किंगच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हुतात्मा दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाला अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्या मागण्या अद्याप मान्य करण्यात आलेल्या नाहीत.
या कार्यक्रमा दरम्यान शेतकरी संघटनांतर्फे प्रशासनाचे या मागण्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी रयत संघटनेचे नेते चुनाप्पा पुजारी, राजू पवार, प्रकाश नाईक आदी उपस्थित होते.