पेपर तपासणीवर बहिष्काराचा फार्स : प्राध्यापक वेठीस धरत असल्याचा अनुभव : ठोस उपाययोजनांची गरज

विद्यार्थ्यांनाच्या जीवावर लाखो रूपये वेतन घेत : ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण कशासाठी ? अहिल्या परकाळे कोल्हापूर मागील काही वर्षांपासून आपल्या विविध मागण्यासाठी विद्यार्थ्यांना पेपर तपासणीच्या कारणावर वेठीस धरण्याची पध्दत शिक्षकांनी अवलंबवली आहे. दहावी-बारावीची परीक्षा सुरू होणार म्हंटले की पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याची स्टाईलच शिक्षकांमध्ये रूढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवावर लाखो रूपये वेतन घेणारे शिक्षक […]

पेपर तपासणीवर बहिष्काराचा फार्स : प्राध्यापक वेठीस धरत असल्याचा अनुभव : ठोस उपाययोजनांची गरज

विद्यार्थ्यांनाच्या जीवावर लाखो रूपये वेतन घेत : ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण कशासाठी ?
अहिल्या परकाळे कोल्हापूर

मागील काही वर्षांपासून आपल्या विविध मागण्यासाठी विद्यार्थ्यांना पेपर तपासणीच्या कारणावर वेठीस धरण्याची पध्दत शिक्षकांनी अवलंबवली आहे. दहावी-बारावीची परीक्षा सुरू होणार म्हंटले की पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याची स्टाईलच शिक्षकांमध्ये रूढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवावर लाखो रूपये वेतन घेणारे शिक्षक ऐन परीक्षेत प्रशासनासह विद्यार्थ्यांना वेठीस धरत असल्याचा अनुभव आहे. शिक्षकांच्या बहिष्कारास्त्रांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतोय. वर्षभर अभ्यास करुन दिलेला पेपरची तपासणी होणार की नाही ? शिक्षकांचा बहिष्कार लांबला तर निकाल लांबून पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान तर होणार नाही ना ? अशी भिती विद्यार्थ्यांच्या मनात घर करते. मागण्या मान्य करण्यांसाठी परिक्षा प्रक्रियेवर बहिष्कार टाकणे हा पर्याय नाही. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठीच आम्ही अध्यापन करीत असलेल्या शिक्षकांची संख्या किती आहे ? तासिका घटकांवर लाखो रुपयांचे वेतन हीच क्रेझ असल्यानेच अनेकजण अध्यापन करतात, या वास्तवाची चर्चाही बहिष्कारामुळे सुरू आहे.
वैद्यकीय बिल, भत्ता, सातवा वेतन आयोग आदींसह मागण्यांसाठी आंदोलन करणे शिक्षकांचा मुलभूत हक्क आहे. शैक्षणिक सुविधा तसेच शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षकांनी किती आंदोलन केली हा शोध घेण्याचा विषय आहे. मात्र, ऐन परीक्षेत पेपर तपासणीवर बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याचा पडत असलेला प्रघात सामाजिक स्वास्थ बिघडवणारा आहे. या कृतीमुळे शिक्षकांबद्दलचा कमालीचा दुराग्रह वाढत आहे. काही तासांच्या अध्यपणासाठी लाखो रुपयांचे वेतन घेणाऱ्या शिक्षकांबद्दल अशा कृतीने समाजात चिडीचे वातावरण निर्माण होत आहे. बहिष्कारामुळे विद्यार्थी पालकांमध्ये निर्माण होणारे भितीचे वातावरण शिक्षक का निर्माण करतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या अधिकारांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, अध्यापन या पवित्र क्षेत्रातील विद्यार्थी हा महत्वाचा घटकांवर भितीची छाया निर्माण करुन शिक्षक आपल्या मागण्या कशा रेटू शकतात. वर्षभर ज्ञानार्जन करुन विद्यार्थ्यांनी चांगल्याप्रकारे परिक्षा द्यावी, अन् पुढील अध्ययनासाठी सज्ज रहावे या उद्दात्त हेतूनेच शिक्षक वर्षभर शिकवत असतात, आणि विद्यार्थीही कष्ट उपसत असतात. मात्र परिक्षेवर किंवा पेपर तपासणीवर बहिष्कार या एका शब्दाने शिक्षकांबद्दलची असलेल्या आदरणीय प्रतिमेला तडा जात आहे, हे दरवर्षी बहिष्काराची धमकी देण्रायांना कसे उमजत नाही.
शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याची भाषा करणे चुकीचे असल्याची चर्चा पालकांमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षापासून पेपर तपासणीवर बहिष्कार घालून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात. प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला की, आपोआप पेपर तपासणी करून वेळेत निकाल लावण्याचे आश्वासनही दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांच्या जीवावर आपण वेतन घेतो, त्यांना खेळीमेळीच्या वातावरणात परीक्षा देतायावी यासाठी शिक्षक प्रयत्न करीत नाहीत. उलट आपल्याला वेळेत निकाल मिळणार का? या काळजीतच विद्यार्थी परीक्षा देतात. परिणामी काही विद्यार्थ्यांची पेपर व्यवस्थित लिहण्याची मानसिकताही राहात नाही. याचा विचार कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षक संघटना कधी करणार आहेत की नाही? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून काही मागण्या मान्य केल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेत उत्तरपत्रिका तपासल्या जातात. घाईगडबडीत उत्तरपत्रिका तपासल्याने अनेकदा चुका झाल्याचे निदर्शनास आल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी उत्तरपत्रिकेच्या पुर्नतपासणीत उत्तीर्ण होतात. या चुकांना आळा घालण्यासाठी शिक्षकांनी आंदोलनाचा अन्य मार्ग स्विकारला पाहिजे, अशा भावना समाजातील सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. तसेच शिक्षकांनी अकरावीनंतर विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेशच नाकारले पाहिजेत, असेही अनेकांचे म्हणने आहे. परंतू बारावी प्रवेश नाकारले तर शिक्षकांना सरकार वेतन कोणत्या धरतीवर देणार? म्हणूनच शिक्षक प्रवेशावेळी आंदोलन न करता उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकतात. या बहिष्कार आंदोलनातून काहीतरी पदरी पडावे, हीच त्यांची भावना असते. शिक्षक आणि सरकारच्या वादात मात्र विद्यार्थीच भरडले जातात, यात शंका नाही.
शिक्षकांच्या मागण्या
गतवर्षी 1298 वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी या पदांवर कार्यरत केवळ 283 शिक्षकांचे समावेशन करण्यात आले होते. असे असूनही अनेक शिक्षकांचे समावेशन अद्याप झाले नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे. तसेच समावेशन शिक्षकाचे वेतन अद्याप सुरू झालेले नाही. या शिवाय आयटी शिक्षकांना वेतनश्रेणी, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे आदी शिक्षकांच्या मागण्या आहेत.
पहिल्या मॉडरेटरच्या बैठकीला शिक्षक येणार का?
उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार असल्याने पत्र कोल्हापूर विभागीय मंडळाला दिले आहे. त्यामुळे पहिल्या मॉडरेटरच्या बैठकीला शिक्षक उपस्थित राहणार की नाही, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.