प्रसिद्ध युट्यूबर मनिष काश्यप भाजपमध्ये

बिहारचे प्रसिद्ध युट्यूबर मनिष काश्यप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तामिळनाडूत बिहारी कामगारांचा छळ कसा केला जातो, हे दर्शविणारे व्हिडीओ चित्रण काही काळापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केल्याने त्यांना तामिळनाडू सरकारने अटक केली होती. हे चित्रण बनावट असल्याचा आरोप त्यांच्यावर तामिळनाडूच्या द्रमुक सरकारने केला होता. सध्या काश्यप हे जामीनावर आहेत. त्यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप नाकारले […]

प्रसिद्ध युट्यूबर मनिष काश्यप भाजपमध्ये

बिहारचे प्रसिद्ध युट्यूबर मनिष काश्यप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तामिळनाडूत बिहारी कामगारांचा छळ कसा केला जातो, हे दर्शविणारे व्हिडीओ चित्रण काही काळापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केल्याने त्यांना तामिळनाडू सरकारने अटक केली होती. हे चित्रण बनावट असल्याचा आरोप त्यांच्यावर तामिळनाडूच्या द्रमुक सरकारने केला होता. सध्या काश्यप हे जामीनावर आहेत. त्यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप नाकारले आहेत. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाम समर्थक असून त्यामुळेच तामिळनाडूच्या सरकारने आपल्यावर खोटे आरोप लावून कारवाई केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी गुरुवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय मिडीया प्रमुख अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला बळकटी येईल, असा विश्वास या पक्षाचे नेते व्यक्त करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी आपण नेहमीच कार्यरत राहणार आहोत, असे मनिष काश्यप यांनी पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.