Famous Datta Temples महाराष्ट्रातील श्री दत्तात्रेयांची प्रसिद्ध आणि जागृत देवस्थाने
Maharashtra Tourism : महाराष्ट्रामध्ये श्री दत्त संप्रदायाला खूप मोठे आणि महत्त्वाचे स्थान आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध दत्त मंदिरे आहे. श्री दत्तात्रेयांची अनेक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थाने आहे, ज्यांना ‘दत्त क्षेत्र’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात भगवान दत्तात्रेयांची अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहे. यापैकी काही सर्वात महत्त्वाची व लोकप्रिय दत्त मंदिरे आज आपण पाहणार आहोत जेणेकरून दत्त जयंतीला तुम्ही नक्कीच दर्शनाला जाऊ शकता. व दत्तात्रेयांचा आशीर्वाद घेऊ शकाल. तसेच महाराष्ट्रात दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमा विशेष उत्साहाने साजरी होते आणि या सर्व दत्तक्षेत्री मोठ्या यात्रा भरतात.
ALSO READ: Srikshetra Gangapur Yatra दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर
महाराष्ट्रातील प्रमुख आणि प्रसिद्ध दत्त मंदिरे
महाराष्ट्रातील प्रमुख दत्त क्षेत्रे
श्री क्षेत्र माहूर नांदेड -हे साडेतीन दत्त पीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते. श्री परशुरामांची कर्मभूमी आणि रेणुका मातेचे स्थान आहे आणि येथे श्री दत्तात्रेयांचे अतिप्राचीन मंदिर आहे. येथे दत्तात्रेयांचा जन्म झाल्याचे मानले जाते. तसेच रेणुका माता, दत्तात्रेय आणि सप्तऋषींची गुहा येथे आहे. महूरला “दक्षिण कैलास” असेही म्हणतात.
श्री क्षेत्र कारंजा वाशिम-हे श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान आहे. जे श्री दत्त महाराजांचे द्वितीय अवतार आहे. येथील दत्त मंदिर अतिप्राचीन व प्रसिद्ध आहे.
ALSO READ: श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar
श्री क्षेत्र औदुंबर सांगली- कृष्णा नदीकाठी वसलेले हे दत्तात्रेयांचे अत्यंत प्रसिद्ध क्षेत्र आहे येथे प्राचीन वटवृक्ष आहे ज्याखाली दत्तात्रेयांनी तप केल्याचे सांगितले जाते. औदुंबरला “दत्तांचे दुसरे घर” असे मानले जाते. तसेच कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे क्षेत्र अत्यंत निसर्गरम्य आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास-निवास केला होता.
श्री क्षेत्र नरसोबाची वाडी नृसिंहवाडी कोल्हापूर- कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले हे क्षेत्र श्री नृसिंह सरस्वतींच्या १२ वर्षांच्या वास्तव्यामुळे अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच कृष्णा-पंचगंगा संगमाजवळील हे दत्त मंदिर अतिप्राचीन आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी येथे १२ वर्ष राहिले होते असे मानले जाते. याला “दक्षिण काशी” असेही म्हणतात.
श्री क्षेत्र अक्कलकोट सोलापूर-हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान आहे. जे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतारआहे. येथे वटवृक्ष स्वामी समर्थांचे मुख्य मंदिर आहे.
श्री क्षेत्र राक्षसभुवन जालना बीड- हे ठिकाण गोदावरी नदीच्या काठी आहे. येथे श्री दत्तात्रेयांचे मोठे आणि प्राचीन मंदिर आहे.या प्रमुख दत्तस्थानांना अनेक भाविक दत्त जयंती आणि गुरुवारी दर्शनासाठी भेट देतात.
श्री गिरनार दत्त मंदिर त्र्यंबकेश्वर- नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर मार्गावर असलेले गिरनार दत्त मंदिर हे देखील जागृत देवस्थान आहे . टेकडीवर असल्याने “गिरनार दत्त” असे प्रसिद्ध आहे.
ALSO READ: श्री गुरुदेव दत्त मंदिर माणगाव
