Falhari Kachori आषाढी एकादशीला तयार करा कुरकुरीत उपवासाची रताळ्याची कचोरी

रताळी व बटाटे उकडून नंतर सोलून मॅश करुन घ्यावे. त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावे. नंतर गॅसवरुन खाली उतरवून त्यात इतर सर्व सामुग्री घालून सारण तयार करावे. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या …

Falhari Kachori आषाढी एकादशीला तयार करा कुरकुरीत उपवासाची रताळ्याची कचोरी

सारण :- १ मूठ चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणा, चवीप्रमाणे मीठ, आवडीप्रमाणे साखर.

 

कव्हरसाठीचे साहित्य :- २५० ग्रॅम रताळी, १ मोठा बटाटा, जरासे मीठ.

 

कृती :-

रताळी व बटाटे उकडून नंतर सोलून मॅश करुन घ्यावे. त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावे. नंतर गॅसवरुन खाली उतरवून त्यात इतर सर्व सामुग्री घालून सारण तयार करावे.

रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ठेवाव्या. नंतर आयत्या वेळी वर्‍याच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्या. गरमगरम हिरव्या चटणीसोबत सर्व्ह कराव्या.