मुख्यमंत्र्याच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाईल
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार केल्याचे आढळून आले असून याबाबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी गौरीश कळंगुटकर यांनी सायबर गुन्हा विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी भादंसंच्या कलम 499 व 500 तसेच आयटी कायदा कलम 66 (ए) व 66 (सी) अंतर्गत अज्ञात संशयिता विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार केले आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने सोशल मीडिया पोस्टचा काही मजकूर संपादित केला. मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारे संगणक मोबाईल माध्यम वापरून सोशल मीडियाद्वारे प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी मुख्यमंत्र्याच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाईल
मुख्यमंत्र्याच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाईल
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार केल्याचे आढळून आले असून याबाबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी गौरीश कळंगुटकर यांनी सायबर गुन्हा विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी भादंसंच्या कलम 499 व 500 तसेच आयटी कायदा कलम 66 (ए) व 66 (सी) अंतर्गत अज्ञात संशयिता विरोधात गुन्हा नोंद केला आहे. […]
