बनावट गुटखा तयार करणारी टोळी गजाआड

बेळगावच्या तिघांचा समावेश : कोट्यावधीची मशिनरी-गुटखा जप्त : मुधोळ पोलिसांची कारवाई बेळगाव : बनावट गुटखा तयार करणाऱ्या एका टोळीला मुधोळ पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये बेळगावमधील तिघा जणांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून कोट्यावधी रुपये किमतीची मशिनरी व गुटखा जप्त करण्यात आला आहे. देवदुर्ग, हैदराबाद व नवी दिल्ली येथे छापे टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. एव्हरख्राईस्ट इंडस्ट्री एलएलपीपीआर धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही […]

बनावट गुटखा तयार करणारी टोळी गजाआड

बेळगावच्या तिघांचा समावेश : कोट्यावधीची मशिनरी-गुटखा जप्त : मुधोळ पोलिसांची कारवाई
बेळगाव : बनावट गुटखा तयार करणाऱ्या एका टोळीला मुधोळ पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये बेळगावमधील तिघा जणांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून कोट्यावधी रुपये किमतीची मशिनरी व गुटखा जप्त करण्यात आला आहे. देवदुर्ग, हैदराबाद व नवी दिल्ली येथे छापे टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. एव्हरख्राईस्ट इंडस्ट्री एलएलपीपीआर धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. आरएमडी पानमसाला व एम गोल्ड सेंटेंड तंबाखूचे पाऊच तयार करून त्यांची विक्री केली जात होती. अटक करण्यात आलेल्या सर्व नऊ जणांविरुद्ध मुधोळ पोलीस स्थानकात भादंवि 420, 465, 468 व 7 कोटपा कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद वसीम, रा. मानवी, सध्या रा. देवदुर्ग, मुनीर, हिमायत, दोघेही रा. हैदराबाद, मोहम्मदअली, रा. नवी दिल्ली, विकास चव्हाण, संतोष बल्लोळी, दोघेही रा. निपाणी, जहीरअब्बास, नदीम, इक्बाल, तिघेही रा. बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुधोळचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रमेश पाटील, राकेश बगली, अजितकुमार होसमनी, आर. बी. कटगेरी, बीराप्पा कुरी, हणमंत मादर, मारुती दळवाई, दादापीर अत्तावर, एच. वाय. कोळी, एस. वाय. ऐदमनी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.