निवडणुकीनंतर 50 लाख लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता?
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. निवडणुकीच्या काळात सरसकट सर्व महिलांचे अर्ज स्विकारण्यात आले होते. पण आता या अर्जांची पुन्हा छाननी होणार आहे. आता महायुती सत्तेत आल्यानंतर पुन्हा निकष तपासण्यात येणार आहेत.सर्वसामान्य महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन देत सरकारने लाखो अर्ज स्वीकृत केले. मात्र, आता निवडणुका पार पडल्यावर या योजनांवर पुनर्विचार सुरू झाला आहे. 50 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे 2.46 कोटी लाभार्थ्यांपैकी किमान 25% निकामी होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे सरकार दरमहा कार्यक्रमावर खर्च करत असलेल्या 3690 कोटींपैकी 900 कोटी वाचवेल.विधानसभा निवडणुकीच्या काळात, सत्ताधारी पक्षांनी महिलांना आपले ‘लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ’ असल्याचे भासवले होते. मात्र, आता सत्तेवर आल्यानंतर हेच नेते निकषांच्या नावाखाली महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला जात आहे.या योजनेच्या बदललेल्या अटींमुळे महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. आर्थिक मदतीची गरज असलेल्या महिलांना अचानक अपात्र ठरवले जात आहे, आणि त्यांची रक्कम परत घेतली जात असल्याने महिला वर्गामध्ये सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे.हेही वाचा8 खासदार अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता
भाजप सदस्य नोंदणी मोहीम सुरू
Home महत्वाची बातमी निवडणुकीनंतर 50 लाख लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता?
निवडणुकीनंतर 50 लाख लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता?
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. निवडणुकीच्या काळात सरसकट सर्व महिलांचे अर्ज स्विकारण्यात आले होते. पण आता या अर्जांची पुन्हा छाननी होणार आहे. आता महायुती सत्तेत आल्यानंतर पुन्हा निकष तपासण्यात येणार आहेत.
सर्वसामान्य महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन देत सरकारने लाखो अर्ज स्वीकृत केले. मात्र, आता निवडणुका पार पडल्यावर या योजनांवर पुनर्विचार सुरू झाला आहे. 50 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे 2.46 कोटी लाभार्थ्यांपैकी किमान 25% निकामी होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे सरकार दरमहा कार्यक्रमावर खर्च करत असलेल्या 3690 कोटींपैकी 900 कोटी वाचवेल.
विधानसभा निवडणुकीच्या काळात, सत्ताधारी पक्षांनी महिलांना आपले ‘लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ’ असल्याचे भासवले होते. मात्र, आता सत्तेवर आल्यानंतर हेच नेते निकषांच्या नावाखाली महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला जात आहे.
या योजनेच्या बदललेल्या अटींमुळे महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. आर्थिक मदतीची गरज असलेल्या महिलांना अचानक अपात्र ठरवले जात आहे, आणि त्यांची रक्कम परत घेतली जात असल्याने महिला वर्गामध्ये सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे.हेही वाचा
8 खासदार अजित पवारांसोबत जाण्याची शक्यताभाजप सदस्य नोंदणी मोहीम सुरू
