Ahmedabad plane crash मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त केला

गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. मिळालेल्या माहितनुसार गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर …

Ahmedabad plane crash मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त केला

गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.

 

मिळालेल्या माहितनुसार गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना अपघातग्रस्त झाले. या विमानात एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. एअर इंडियाचे विमान बोईंग ७८७-८ ट्विन जेट होते. पोलिस नियंत्रण कक्षानुसार, एअर इंडियाचे विमान एआय १७१ लंडनला जात होते.

ALSO READ: Ahmedabad plane crash अहमदाबादमध्ये विमान अपघात, २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान लंडनला जात होते

हा विमान अपघात इतका भयानक होता की काही वेळातच संपूर्ण आकाशात काळ्या धुराचे ढग पसरले. या अपघातानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.  

 

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: फडणवीस-राज ठाकरे यांच्यातील गुप्त बैठकीमुळे खळबळ उडाली, राजकीय वर्तुळात चर्चेचे वादळ उठले

Go to Source