महाराष्ट्राप्रमाणे कारखान्यांनी ऊसदर द्यावा
कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांची मागणी : बळीराजाची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक : गाळप हंगाम गतीने सुरू
कोगनोळी : नजीकच्या कोल्हापूर जिह्यासह परिसरात अनेक साखर कारखाने असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या ऊसदरामध्ये 300 ते 400 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांनी महाराष्ट्राप्रमाणे ऊस दर द्यावा, अशी आग्रही मागणी सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे. बेळगाव जिह्यातील सीमाभागात असणाऱ्या चिकोडी व निपाणी तालुक्यातील अनेक साखर कारखान्यांनी 3000 रुपये दर देऊन ऊस नेण्याचा सपाटा चालू ठेवला आहे. याला विरोध करण्यासाठी कर्नाटकातील निपाणी व चिकोडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष धुमसत असून दरवाढीसंदर्भात बैठका व हालचाली सुरू आहेत.
शेतकऱ्यांचा अंत पाहू नये
कर्नाटकातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. महाराष्ट्राप्रमाणे दर देणे परवडत असताना देखील कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्यांची हिताची काळजी न करता कर्नाटकातील शेतकऱ्यांचा ऊस हे कारखानदार बेजबाबदारपणे उचलत आहेत. याची जाणीव सर्वसामान्य शेतकऱ्यांना आता होऊ लागली आहे. शेतकऱ्यांमध्ये कर्नाटकातील साखर कारखान्यांच्या दराबाबत मोठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना 3200 ते 3400 रुपये दर परवडतो मग कर्नाटकात का नाही?, असा सवाल अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
कर्नाटक सरकारने मागील वेळेचा 150 रुपये दर द्यावा असा आदेश काढला होता. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक होते. सध्याचा शेतकरी दुष्काळी अवस्थेमध्ये आहे. उत्पादन कमी होऊन वजनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. शेतकऱ्यांची ही एक प्रकारे पिळवणूकच आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांना 10 ते 13 रिकव्हरी असताना देखील केवळ 3000 रुपयांचा दर दिला आहे. तरी कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांनी महाराष्ट्राप्रमाणे किमान 3200 ते 3300 रुपये दर देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासावे, अशी मागणी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे.
Home महत्वाची बातमी महाराष्ट्राप्रमाणे कारखान्यांनी ऊसदर द्यावा
महाराष्ट्राप्रमाणे कारखान्यांनी ऊसदर द्यावा
कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांची मागणी : बळीराजाची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक : गाळप हंगाम गतीने सुरू कोगनोळी : नजीकच्या कोल्हापूर जिह्यासह परिसरात अनेक साखर कारखाने असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या ऊसदरामध्ये 300 ते 400 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांनी महाराष्ट्राप्रमाणे ऊस दर द्यावा, अशी […]