Facebook, Instagram Down : जगभरात फेसबुक, ट्विटरची सेवा ठप्प
जगभरात मेटाची सेवा बंद पडली आहे. त्यामुळे फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाचे सर्व अॅप्लिकेशन्स आणि सोशल मीडिया साईट्स बंद आहेत. सर्वांच्या फोन, लॅपटॉप आणि कम्प्युटरवरील फेसबूक, इन्स्टाग्राम अकाऊंट्स आपोआप लॉगआऊट होत आहेत. त्यानंतर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तरी अॅप्लिकेशन्स सुरू होत नसल्याची तक्रार युजर्स करत आहेत. इन्स्टाग्रामवरील फोटो, व्हिडीओ दिसत नाहीयेत. भारतात रात्री नऊ वाजल्यापासून मेटाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. नेटीझन्स फेसबूक आणि इन्स्टाग्राम बंद असल्याची तक्रार करत आहेत. एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसह सर्वत्र याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे.फेसबूकसह इन्स्टाग्राम, मेसेंजर, थ्रेड आणि मेटाचे इतर सर्व प्रकारचे अॅप्लिकेशन्स आणि संकेतस्थळं बंद आहेत. याबाबत मेटाकडून कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाही. यापूर्वीदेखील जेव्हा-जेव्हा फेसबूकची सेवा ठप्प झाली होती तेव्हादेखील मेटाने कधी सेवा ठप्प होण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हतं. दरम्यान, Downdetector च्या रिपोर्टनुसार भारतीय वेळेनुसार रात्री ९.१० वाजल्यापासून देशात मेटाची सेवा ठप्प आहे.
Home महत्वाची बातमी Facebook, Instagram Down : जगभरात फेसबुक, ट्विटरची सेवा ठप्प