लोककल्प फाऊंडेशनतर्फे चिगुळेत नेत्रतपासणी
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा पोहोचविल्या जात आहेत. नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील चिगुळे गावामध्ये नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. नागरिकांच्या नेत्रतपासणीसोबतच उपचार व जागरुकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरादरम्यान कुशल नेत्रतज्ञ व तंत्रज्ञांनी नेत्रतपासणी केली. नागरिकांच्या दृष्टी चाचण्या, डोळ्यांच्या दाबांचे मूल्यांकन, मोतीबिंदू, काचबिंदू याविषयी तपासणी करण्यात आली. चिगुळे ग्रामस्थांच्यावतीने नागरिकांचे आभार मानण्यात आले. यावेळी नंदादीप आय केअर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी आनंद, प्रितेश पोटेकर, सुहास पेडणेकर यासह इतर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी लोककल्प फाऊंडेशनतर्फे चिगुळेत नेत्रतपासणी
लोककल्प फाऊंडेशनतर्फे चिगुळेत नेत्रतपासणी
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा पोहोचविल्या जात आहेत. नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील चिगुळे गावामध्ये नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. नागरिकांच्या नेत्रतपासणीसोबतच उपचार व जागरुकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरादरम्यान कुशल नेत्रतज्ञ व तंत्रज्ञांनी नेत्रतपासणी केली. नागरिकांच्या दृष्टी चाचण्या, डोळ्यांच्या दाबांचे मूल्यांकन, मोतीबिंदू, काचबिंदू याविषयी तपासणी करण्यात आली. चिगुळे ग्रामस्थांच्यावतीने नागरिकांचे आभार […]
