लोककल्पतर्फे बैलूर येथे नेत्रतपासणी
बेळगाव : लोककल्प फौंडेशनने डॉ. अग्रवाल हेल्थ केअर लिमिटेडच्या नेत्रदर्शन सुपरस्पेशालिटी आय केअर युनिटच्या सहकार्याने बैलूर गावामध्ये नेत्रतपासणी करण्यात आली. नेत्रदर्शन आय केअरच्या नेत्रतज्ञांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. मोतिबिंदूसह सामान्य व इतर नेत्र तपासणी शिबिरादरम्यान करण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून लोककल्प फौंडेशनचे काम सुरू आहे. शिबिरादरम्यान ज्या नागरिकांना मोतिबिंदू आढळून आले, त्यांना पुढील उपचारासाठी समुपदेशन करण्यात आले. यावेळी लोककल्प विभागाचे कर्मचारी प्रसाद असूकर, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे तसेच नेत्रदर्शनचे पीआरओ उदय व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी लोककल्पतर्फे बैलूर येथे नेत्रतपासणी
लोककल्पतर्फे बैलूर येथे नेत्रतपासणी
बेळगाव : लोककल्प फौंडेशनने डॉ. अग्रवाल हेल्थ केअर लिमिटेडच्या नेत्रदर्शन सुपरस्पेशालिटी आय केअर युनिटच्या सहकार्याने बैलूर गावामध्ये नेत्रतपासणी करण्यात आली. नेत्रदर्शन आय केअरच्या नेत्रतज्ञांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. मोतिबिंदूसह सामान्य व इतर नेत्र तपासणी शिबिरादरम्यान करण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून लोककल्प […]