यल्लम्मा यात्रेसाठी आजपासून जादा बस
बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून बेळगाव-सौंदत्ती मार्गावर जादा बस धावणार आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही विशेष बससेवा सुरू राहणार आहे. शाकंभरी पौर्णिमेसाठी यल्लम्मा यात्रेनिमित्त सौंदत्तीला जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर 22 ते 31 जानेवारी दरम्यान परिवहनमार्फत 30 जादा बस सोडल्या जाणार आहेत. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास होणार आहे. गतवर्षी यल्लम्मा यात्रेतून परिवहनला समाधानकारक उत्पन्न प्राप्त झाले होते. यंदा देखील यल्लम्मा यात्रा परिवहन महामंडळाला पावेल, अशी अपेक्षा आहे.
Home महत्वाची बातमी यल्लम्मा यात्रेसाठी आजपासून जादा बस
यल्लम्मा यात्रेसाठी आजपासून जादा बस
बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून बेळगाव-सौंदत्ती मार्गावर जादा बस धावणार आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही विशेष बससेवा सुरू राहणार आहे. शाकंभरी पौर्णिमेसाठी यल्लम्मा यात्रेनिमित्त सौंदत्तीला जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर 22 ते 31 जानेवारी दरम्यान […]
