परराष्ट्रमंत्री जयशंकर रशिया दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ मॉस्को
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर सध्या पाच दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी मॉस्को येथे दाखल झाले आले असून त्यादरम्यान ते रशियन परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करतील. ते विविध द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. या दौऱ्यात ते सेंट पीटर्सबर्गलाही जाणार आहेत. भारत-रशिया भागिदारी स्थिर आणि भक्कम करण्यासाठी जयशंकर यांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. जयशंकर रशिया दौऱ्यामध्ये उपपंतप्रधान आणि उद्योग-व्यापार मंत्री डेनिस मँतुरोव यांची भेट घेऊन आर्थिक सहभागाशी संबंधित विषयांवर चर्चा करतील. तसेच दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा अपेक्षित आहे. विशेषत: व्यापार, ऊर्जा, संरक्षण आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांवर अधिक भर देण्याचा विचारही आहे.
Home महत्वाची बातमी परराष्ट्रमंत्री जयशंकर रशिया दौऱ्यावर
परराष्ट्रमंत्री जयशंकर रशिया दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ मॉस्को परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर सध्या पाच दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी मॉस्को येथे दाखल झाले आले असून त्यादरम्यान ते रशियन परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करतील. ते विविध द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. या दौऱ्यात ते सेंट पीटर्सबर्गलाही जाणार आहेत. भारत-रशिया भागिदारी स्थिर आणि भक्कम करण्यासाठी जयशंकर यांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचा दावा […]