कॅन्टोन्मेंट बोर्ड हस्तांतरण प्रक्रियेला गती

मनपा महसूल अधिकाऱ्यांची कॅन्टोन्मेंट बोर्डला भेट बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून सर्वेक्षण करण्याबाबत सूचना केल्या असताना दुसरीकडे मंगळवारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाला भेट देऊन महसूल संदर्भातील माहिती जाणून घेतली. कॅन्टोन्मेंटमधील नागरी वसाहती महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यास बोर्डने सहमती दर्शविली असली तरी नागरिकांनी मात्र विरोध केला होता. नागरी […]

कॅन्टोन्मेंट बोर्ड हस्तांतरण प्रक्रियेला गती

मनपा महसूल अधिकाऱ्यांची कॅन्टोन्मेंट बोर्डला भेट
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून सर्वेक्षण करण्याबाबत सूचना केल्या असताना दुसरीकडे मंगळवारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाला भेट देऊन महसूल संदर्भातील माहिती जाणून घेतली. कॅन्टोन्मेंटमधील नागरी वसाहती महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यास बोर्डने सहमती दर्शविली असली तरी नागरिकांनी मात्र विरोध केला होता. नागरी वसाहतीसोबत बंगलो एरियाही महानगरपालिकेकडे द्यावा, अशी मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केली होती.
याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत सर्वेक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार महानगरपालिकेचे अधिकारी व कॅन्टोन्मेंटमधील रहिवासी संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.  मंगळवारी सकाळी महानगरपालिकेच्या महसूल अधिकारी रेश्मा तालिकोटी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाला भेट दिली. कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार यांच्याशी महसूलसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. कॅन्टोन्मेंटमध्ये जमा होणाऱ्या महसुलाची तालिकोटी यांनी माहिती घेतली. तासभर ही चर्चा झाली. यामुळे हस्तांतरणाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे दिसून येत आहे.