खासदार-आमदारांकडून तालुका विकासाच्या अपेक्षा
खासदार अनंतकुमार हेगडे यांचा पाढा गिरविणार की विकासगंगा आणणार : नगरपंचायतीचा दर्जा वाढविण्याची नितांत आवश्यकता
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार वेश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी प्रचंड मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. यावेळीही खानापूरने भाजपला मतांची आघाडी दिलेली आहे. पहिल्यांदाच खासदार बनलेल्या कागेरी यांच्याकडून तालुक्यातील जनतेच्या विकासाची अपेक्षा आहे. तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि कागेरी हे दोन्ही भाजपचेच असल्याने तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील का, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. गेल्या 30 वर्षापासून खानापूरनें खासदार म्हणून अनंतकुमार हेगडे यांना कायम साथ दिली होती. मात्र हेगडे यांनी आपल्या कार्यकाळात खानापूरच्या विकासासाठी काहीच योगदान दिलेले नाही. यापूर्वीही भाजपचे आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या वेळीही खासदार अनंतकुमार हेगडे यांनीही विकासासाठी काहीही प्रयत्न केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व सामान्य जनेतेतून अनंतकुमार हेगडे यांच्याविषयी तीव्र नाराजी होती. कागेरी हे शिक्षणमंत्री असताना तालुक्यातील अतिथी शिक्षकांसाठी प्रयत्न करून अतिथी शिक्षकांच्या जागा वाढवून दिल्या होत्या. कागेरी हे तालुक्यात सर्वाना परिचित असून तालुक्यातील समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. तसेच ते आमदार म्हणून त्यांनी पाचवेळा विधानसभेत काम केलेले आहे. तसेच शिक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. आमदारकीच्या निवडणुका होऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र अद्याप आमदाराकडून म्हणावा तसा विकासासाठी प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. खासदार आणि स्थानिक आमदार भाजपचेच असल्याने वैचारिक एकसंघता साधून विकासासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तालुक्याचा सर्वांगीण विकास हवा
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यात दुर्गंम भागातील गावांसाठी दळणवळण, शैक्षणिक तसेच पाण्याची व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वनखात्याच्या आडमुठे धोरणामुळे रस्ता व पुलांसाठी निधी मंजूर होऊनही रस्त्याची कामे होऊ शकली नाहीत. यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तालुक्याच्या दुर्गंम भागातील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात असलेली कमतरता दूर करुन शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खासदाराकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे. तसेच बेळगाव-गोवा महामार्गात तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणात संपादीत केली आहे. मात्र शेतकऱ्यांना गेल्या 15 वर्षापासून शेतीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. यासाठी जिल्हाधिकारी आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक घेऊन शेतकऱ्यांना तातडीने न्याय देणे गरजेचे आहे. शहरासह तालुक्याचा औद्योगिक विकास खुंटला आहे. यासाठी तालुक्यात औद्योगिक प्रकल्प उभारणीसाठी केंद्र पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तालुक्यात निसर्ग साधनतेमुळे पर्यटनासाठी वाव आहे. पर्यटनाच्या माध्यमातूनही निश्चित विकास साधण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
नगरपंचायतीचा दर्जा वाढवा
शहराच्या सर्वागीण विकासासाठी नवा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. शहरातील रस्त्यांच्या रुंदीमुळे वाहतुकीची कोंडी कायमचीच डोकेदुखी बनली आहे. यासाठी राजा छ. स्मारक ते जुना मोटरस्टँड, बेंद्रे खुट्ट बाजारपेठ ते पारिश्वाड क्रॉससह शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी मास्टर प्लॅन राबवण्यासाठी खासदाराकडून आराखडा तयार करणे गरजेचे आहे. तसेच शहराच्या भुयारी गटारीचा प्रश्न मार्गी लावून मलप्रभा नदीचे होणारे प्रदूषण थांबविणे अत्यंत गरजेचे बनले आहे. तसेच शहरातील मलप्रभा क्रीडांगणाच्या विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहरातून जाणारा तालगुप्पा रस्त्याच्या विकासासाठी प्रयत्न करून राजा टाईल्स ते गोवा क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या विकासाबाबत तातडीने क्रम घेणे गरजेचे आहे. शहराच्या विकासाबरोबरच शहरालगत होत असलेल्या तीन कि. मी. परिघातील उपनगरांचा समावेश शहरात करून सध्या अस्तित्वात असलेल्या नगरपंचायतीचा दर्जा वाढवून नगरपरिषद किंवा नगरपालिका करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासह विविध विकासकामांसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
Home महत्वाची बातमी खासदार-आमदारांकडून तालुका विकासाच्या अपेक्षा
खासदार-आमदारांकडून तालुका विकासाच्या अपेक्षा
खासदार अनंतकुमार हेगडे यांचा पाढा गिरविणार की विकासगंगा आणणार : नगरपंचायतीचा दर्जा वाढविण्याची नितांत आवश्यकता खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार वेश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी प्रचंड मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. यावेळीही खानापूरने भाजपला मतांची आघाडी दिलेली आहे. पहिल्यांदाच खासदार बनलेल्या कागेरी यांच्याकडून तालुक्यातील जनतेच्या विकासाची अपेक्षा आहे. तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि कागेरी […]
