17 जुलैपासून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता : IMD
मंगळवारी मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, हा अंदाज चुकिचा निघाला. मंगळवारी आकाश तुलनेने निरभ्र होते आणि मुसळधार पाऊस पडला नाही. दरम्यान, बुधवारपासून शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागात मान्सून पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईसह इतर भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यानंतर मंगळवारी मुंबईत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात पावसाने मंगळवारी शहर आणि उपनगरात विश्रांती घेतली.मंगळवारी हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रात 0.8 मिमी तर सांताक्रूझ केंद्रात 1.5 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारपासून पुढील दोन ते तीन दिवस शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या काळात संध्याकाळी किंवा रात्री काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 आणि 25 अंश सेल्सिअस राहील.यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत मुसळधार, नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव परिसरात हलका, तर नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हेही वाचाआता IIT-Bombayचे ‘हे’ अॅप देणार हवामानाचा अंदाज
दिल्ली आता दूर नाही! माथेरानच्या डोंगरातून निघणार बोगदा
Home महत्वाची बातमी 17 जुलैपासून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता : IMD
17 जुलैपासून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता : IMD
मंगळवारी मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, हा अंदाज चुकिचा निघाला. मंगळवारी आकाश तुलनेने निरभ्र होते आणि मुसळधार पाऊस पडला नाही. दरम्यान, बुधवारपासून शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागात मान्सून पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईसह इतर भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यानंतर मंगळवारी मुंबईत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात पावसाने मंगळवारी शहर आणि उपनगरात विश्रांती घेतली.
मंगळवारी हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रात 0.8 मिमी तर सांताक्रूझ केंद्रात 1.5 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारपासून पुढील दोन ते तीन दिवस शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या काळात संध्याकाळी किंवा रात्री काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 आणि 25 अंश सेल्सिअस राहील.
यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत मुसळधार, नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव परिसरात हलका, तर नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हेही वाचा
आता IIT-Bombayचे ‘हे’ अॅप देणार हवामानाचा अंदाजदिल्ली आता दूर नाही! माथेरानच्या डोंगरातून निघणार बोगदा