रोहित नंदा यांचे उत्कृष्टपणे गझल सादरीकरण

ऑर्चिड रिसॉर्टमध्ये अल्हाददायी वातावरणात कार्यक्रम : रसिक तृप्त बेळगाव मोहबत करनेवाले, कम ना होंगे तेरी मैफिल मे, हम नही होंगे, आओगे तुम जब साजना, अंगना मे फुल खिलेंगे या आणि अनेक अर्थपूर्ण गझल रोहित नंदा या गायकाने सादर केल्या. नावगे येथील ऑर्चिड रिसॉर्ट येथे शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. ऑर्चिडमधील हिरवाई सायंकाळनंतर दिव्याच्या रोषणाईमुळे उजळलेला परिसर, […]

रोहित नंदा यांचे उत्कृष्टपणे गझल सादरीकरण

ऑर्चिड रिसॉर्टमध्ये अल्हाददायी वातावरणात कार्यक्रम : रसिक तृप्त
बेळगाव
मोहबत करनेवाले, कम ना होंगे
तेरी मैफिल मे, हम नही होंगे,
आओगे तुम जब साजना, अंगना मे फुल खिलेंगे
या आणि अनेक अर्थपूर्ण गझल रोहित नंदा या गायकाने सादर केल्या. नावगे येथील ऑर्चिड रिसॉर्ट येथे शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. ऑर्चिडमधील हिरवाई सायंकाळनंतर दिव्याच्या रोषणाईमुळे उजळलेला परिसर, दिव्यांमधून पाझरणारा स्निग्ध प्रकाश अशा अल्हाददायी वातावरणात गझल गायनाने मन प्रसन्न केले. रोहीत यांनी तेरे नाम से ही शुरू, तेरे नामसेही खतम, आज जाने की जिद ना करो, होटोंसे छु लो तुम, इश्क की साजीशे, ओ लाल मेरी, फिझा तेरा रंग था मै, चांदसी बारीश अशा अनेक उत्तमोत्तम गझल व ‘ए मेरी जोहराजबी’ ही कव्वाली तन्मयतेने सादर केल्या. उपस्थितीतांनीही टाळ्या वाजवून आणि फर्माईश करून त्यांचे प्रोत्साहन वाढविले.
कलाकारांचे कौतुक
त्यांना ड्रम्सवर अनिकेत यांनी व कीबोर्डवर वासुदेव यांनी साथ केली. भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे समुह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी कलाकारांचे कौतुक केले.