मतदानाद्वारे प्रत्येकाने कर्तव्यपालन करावे

गोवा मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांचे आवाहन: दोन्ही मतदारसंघांत मिळून 11 ,79, 344 मतदार : उद्या मतदान पणजी : मतदान हा प्रत्येक नागरिकाचा नेता निवडण्याचा आणि सरकार स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. देशासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. लोकशाही यशस्वीपणे चालवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मुख्य निवडणूक […]

मतदानाद्वारे प्रत्येकाने कर्तव्यपालन करावे

गोवा मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांचे आवाहन: दोन्ही मतदारसंघांत मिळून 11 ,79, 344 मतदार : उद्या मतदान
पणजी : मतदान हा प्रत्येक नागरिकाचा नेता निवडण्याचा आणि सरकार स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. देशासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. लोकशाही यशस्वीपणे चालवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदारांना आणि बूथवर नियुक्त कर्मचाऱ्यांना सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. राज्यातील सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी  केले आहे. राज्यातील 11,79,344 मतदार एकूण सोळा उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. राज्यभरात 1725 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, उत्तरेत 863, तर दक्षिणेत 862 मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांपैकी उत्तर गोव्यातील 43 आणि दक्षिण गोव्यातील 45 मॉडेल मतदान केंद्रे आहेत. राज्यात यावर्षी लोकसभेसाठी 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल, असा विश्वास वर्मा यांनी व्यक्त केला.
मतदारांच्या सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न
मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि मतदारांचा प्रतीक्षा कालावधी कमी करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरी भागात जेथे वृद्ध मतदारांची टक्केवारी जास्त आहे, अशा 8 मॉडेल मतदान केंद्रांवर वैद्यकीय शिबिरे भरविण्यात येणार आहेत. मतदान केल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आरोग्य सेवा संचालनालयाकडून डॉक्टरांनी प्रदान केलेल्या आरोग्य तपासणीच्या मूलभूत सुविधेचा लाभ घेऊ शकतात. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांच्या तरतुदीचे महत्त्व लक्षात घेऊन आणि प्रवेशसुलभता, सर्वसमावेशकता आणि निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक कार्यालयाने अनेक उपक्रम हाती घेतल्याचेही वर्मा यांनी सांगितले.
राज्यात 40 पिंक बूथची स्थापना
निवडणूक प्रक्रियेत तऊणांच्या सहभागाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक जिह्यात एक बूथ स्थापन करून युवा मतदान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.  महिला मतदारांना सक्षम करण्यासाठी आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिह्यांमध्ये महिलांसाठी प्रत्येकी 20 या प्रमाणे 40 पिंक बूथ निश्चित करण्यात आले आहेत.
दोन्ही जिह्यांत 40 हरित मतदान केंद्रे
पर्यावरणीय शाश्वततेला प्राधान्य देत दोन्ही जिह्यांमध्ये 40 हरित मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. हे इको-फ्रेंडली बूथ स्थानिक विक्रेत्यांकडील बांबू आणि माडाची झावळ्यासारख्या पर्यावरणीय टिकाऊ सामग्रीचा वापर करून सजवलेले आहेत.
दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र मतदान केंद्रे
दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी, दोन्ही जिह्यांमध्ये स्वतंत्र दिव्यांग मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. ज्यात उत्तर गोव्यात 5 आणि दक्षिण गोव्यात 3 आहेत. हे बूथ केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केले जाणार आहेत. व्हीलचेअर, रॅम्प, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामधील ब्रेल वैशिष्ट्यो, स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि दिव्यांग मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय सहज प्रवेश मिळावा, यासाठी इतर सुविधांनी ही केंद्रे सुसज्ज करण्यात आली आहे.
विशेष थीम आधारित मतदान केंद्रे
विशेष थीम-आधारित मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पणजीमध्ये भाग 3, अॅडमिन ब्लॉक नं. जी 5, जुने जीएमसी रायबंदर आणि कुंभारजुवे येथील 01 सरकारी प्राथमिक व्हँक्सिम साओ मार्टिन्स येथे युनिक बूथची थीम पारंपरिक मासेमारीवर केंद्रित राहणार आहे. दक्षिण गोव्यात मतदान केंद्र क्रमांक 36, मडगाव नगरपरिषदेचे अद्वितीय बूथ, जुन्या हेरिटेज इमारतीत ठेवण्यात येणार आहे. स्लाइड शो, पोस्टर्स, बॅनर आणि इतर सजावटीच्या वस्तूंसारख्या सजावटीद्वारे इमारतीच्या ऐतिहासिक थीमवर प्रकाश टाकला जाईल. शिवाय, इमारतीलगतचे वाहतूक बेटही त्यानुसार सुशोभित केले जाणार आहे.
औषधी किंवा फळ देणारी 7500 रोपे लावणार
निवडणूक आयोगाच्या हरित उपक्रमांतर्गत गोव्यात औषधी किंवा फळ देणारी रोपे लावण्याचे आयोजन केले आहे. सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान अधिकाऱ्यांद्वारे अशा रोपांची लागवड केली जाणार आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर ही झाडे बूथवर पोहोचतील. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 5 रोपे लावण्यात येणार आहेत. मतदारांना पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी संपूर्ण गोव्यात 7,500 रोपे लावण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे.
प्रचार संपला, लक्ष मतदानाकडे
गोव्यात मंगळवार 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार संपुष्टात आला असून आता सर्वांचे लक्ष मतदानाकडे लागलेले आहे. जाहीर प्रचार संपला असला तरी प्रत्यक्ष मतदानापर्यंत मतदारांच्या गाठीभेटी चालूच राहाणार आहेत.  काँग्रेस पक्षातर्फे एकही मोठी सभा झाली नाही. भाजपने मात्र पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मोठ्या प्रचार सभा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले. जाहीर प्रचारात भाजपने बाजी मारल्याचे दिसून आले. काँग्रेससह, आरजीपी व भाजप हे तीन प्रमुख पक्ष रिंगणात आहे. काँग्रेस, आरजीपीच्या मोठ्या सभा झाल्याच नाहीत. एकंदरित परिस्थिती पाहता भाजप प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ

पुऊष : 281486
महिला : 299088
तृतीय पंथी : 3

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ

पुऊष : 290131
महिला : 308627
तृतीय पंथी : 9
राज्यातील एकूण मतदार : 11,79,344

मतदानासाठी विविध ओळखपत्रांचा पर्याय
मतदान करण्यासाठी ओळखपत्र पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. हे ओळखपत्र नसेल तर आधार कार्ड, बँक पासबूक ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट यापैकी एखादे ओळखपत्र मतदानासाठी पुरावा म्हणून सादर करता येईल, असे  निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.
राज्यातील दिव्यांग मतदार

उत्तर गोवा मतदारसंघ : 4,977
दक्षिण गोवा मतदारसंघ : 4,446

राज्याती युवा मतदार

उत्तर गोवा मतदारसंघ : 13,244
दक्षिण गोवा मतदारसंघ : 14,798

85 वर्षांवरील मतदार

उत्तर गोवा मतदारसंघ : 6286
दक्षिण गोवा मतदारसंघ : 5,216

देशाबाहेर असलेले मतदार

उत्तर गोवा मतदारसंघ : 37
दक्षिण गोवा मतदारसंघ : 47