पेडणेच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे : नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर

पेडणे : पेडणे पालिकीची नवीन सुसज्ज इमारत पूर्णत्वास येत असून पेडणे पालिकेचे  कार्यालय नवीन इमारती स्थलांतर लवकरच होणार आहे. आमदार प्रवीण आर्लेकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यामुळे पेडणे पालिकेचा विकास होत आहे.  सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून पेडणे पालिका क्षेत्राचा विकास करण्यात येईल. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी पेडणे पालिकेच्या […]

पेडणेच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे : नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर

पेडणे : पेडणे पालिकीची नवीन सुसज्ज इमारत पूर्णत्वास येत असून पेडणे पालिकेचे  कार्यालय नवीन इमारती स्थलांतर लवकरच होणार आहे. आमदार प्रवीण आर्लेकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यामुळे पेडणे पालिकेचा विकास होत आहे.  सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून पेडणे पालिका क्षेत्राचा विकास करण्यात येईल. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी पेडणे पालिकेच्या गोवा मुक्ती दिनी ध्वजारोहण केल्यानंतर केले. यावेळी व्यासपीठावर मत्स्य व्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, पालिका मुख्याधिकारी अनंत मळीक, उपनगराध्यक्ष आश्विनी पालयेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेवक मनोज हरमलकर, नगरसेवक माधव सिनाई देसाई, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, माजी उपनगराध्यक्ष नारायण मयेकर, रामा सावळ देसाई आदी यावेळी उपस्थित होते.  सुऊवातीला नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी व्हायकाऊंट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी, भगवती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. सूत्रसंचालन दयानंद नावेलकर यांनी केले तर उपनगराध्यक्ष आश्विनी पालेकर यांनी आभार मानले.

Go to Source