ऑनलाईन नोंदणी केल्यावरच मंत्रालयात प्रवेश

विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्यांना यापुढे राज्य (maharashtra) सरकारच्या DigiPravesh या अॅपवर नोंदणी करून मिळणाऱ्या क्यूआर कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने (state government) घेतला आहे. काहीतरी कामाचे निमित्त करून मंत्रालयात येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांनाही यापुढे मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही.मंत्रालयाची (mantralay) सुरक्षा आणि दररोज येणारे हजारो नागरिक व वाहनांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात सरकारने मंत्रालय सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत चेहरा पडताळणीच्या आधारे लोकांना मंत्रालयात प्रवेश देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या (project) दुसऱ्या टप्प्यात आता क्षेत्रीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांना अॅप आधारित व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी DigiPravesh हा अॅप विकसित करण्यात आला आहे.मंत्रालयात येणाऱ्या इतर सर्वसाधारण अभ्यागतांना दुपारी 2 वाजल्यानंतर प्रवेश देण्यात येईल. अशा प्रवेशासाठी त्यांना अॅपवर प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येईल. त्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड असे शासनमान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल.नागरिकांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे, केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश मिळेल. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास नागरिकांवर कारवाई केली जाईल.हेही वाचा महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात ‘इतक्या’ उमेदवारांना मिळाली नोकरी मुंबई- मंगळूर मार्गिकेवर लवकरच धावणार वंदे भारत

ऑनलाईन नोंदणी केल्यावरच मंत्रालयात प्रवेश

विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्यांना यापुढे राज्य (maharashtra) सरकारच्या DigiPravesh या अॅपवर नोंदणी करून मिळणाऱ्या क्यूआर कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने (state government) घेतला आहे. काहीतरी कामाचे निमित्त करून मंत्रालयात येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांनाही यापुढे मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही.मंत्रालयाची (mantralay) सुरक्षा आणि दररोज येणारे हजारो नागरिक व वाहनांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात सरकारने मंत्रालय सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत चेहरा पडताळणीच्या आधारे लोकांना मंत्रालयात प्रवेश देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या (project) दुसऱ्या टप्प्यात आता क्षेत्रीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांना अॅप आधारित व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी DigiPravesh हा अॅप विकसित करण्यात आला आहे.मंत्रालयात येणाऱ्या इतर सर्वसाधारण अभ्यागतांना दुपारी 2 वाजल्यानंतर प्रवेश देण्यात येईल. अशा प्रवेशासाठी त्यांना अॅपवर प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येईल. त्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड असे शासनमान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. नागरिकांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे, केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश मिळेल. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास नागरिकांवर कारवाई केली जाईल.हेही वाचामहापालिकेच्या रोजगार मेळाव्यात ‘इतक्या’ उमेदवारांना मिळाली नोकरीमुंबई- मंगळूर मार्गिकेवर लवकरच धावणार वंदे भारत

Go to Source