निवडणूक प्रचारात ‘पाकिस्तान’ची एंट्री
पाकिस्तानच्या नेत्याला राहुल गांधांची भुरळ : मोदींकडून उपरोधिक टीका
मोदींना रोखणे आवश्यक : पाकिस्तानी नेत्याने राहुल गांधींचे केले कौतुक
इस्लामाबाद : भारतात लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. अशास्थितीत आता पाकिस्तानचीही निवडणुकीच्या प्रचारात एंट्री झाली आहे. पाकिस्तानकडून भारतातील निवडणुकीवरून वक्तव्ये सुरू झाली आहेत. पाकिस्तानचे माजी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. चौधरी यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ शेअर करत ‘राहुल ऑफ फायर’ असे नमूद केले आहे. राम मंदिरासंबंधी राहुल गांधी बोलत असतानाचा हा व्हिडिओ आहे. पंतप्रधान मोदींना रोखणे आवश्यक आहे. जो कुणी अतिवाद्यांच्या विरोधात भूमिका घेईल, त्याला माझा पाठिंबा आहे. राहुल गांधी यांनी भारताचे सद्यचित्र अत्यंत योग्यप्रकारे मांडल्याचे माझे मानणे आहे. राहुल गांधींनी भारतात श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी कशाप्रकारे वाढतेय, कशाप्रकारे भारतातून गरीब पूर्णपणे बाजूला फेकला जातोय हे लोकांसमोर आणल्याचा दावा पाकिस्तानी नेत्याने केला आहे. भारताच्या निवडणुकीत कुणाला समर्थन करावे यावरून माझ्यात कुठलाच गैरसमज नाही, असे फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.
‘शहजाद्या’साठी पाक उतावीळ : पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
आणंद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी गुजरातच्या आणंदमध्ये जाहीरसभेला संबोधित केले आहे. काँग्रेसचे ‘शहजादे’ (युवराज) माथ्यावर संविधान ठेवून नाचत आहेत, परंतु या देशात 75 वर्षांपर्यंत देशाच्या सर्व हिस्स्यांवर संविधान लागू व्हायचा का याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. मोदांपूर्वी या देशात दोन संविधान, दोन ध्वज आणि दोन पंतप्रधान होते. काँग्रेसने काश्मीरमध्ये हिंदुस्थानचे संविधान लागू होऊ दिले नव्हते. कलम 370 याकरता भिंत ठरली होती. सरदार पटेल यांच्या भूमीवरून आलेल्या पुत्राने कलम 370 ची भिंत जमीनदोस्त करत काश्मीरमध्ये भारतीय राज्यघटना खऱ्या अर्थाने लागू करविल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत. काश्मीरमध्ये तिरंगा फडकवून, भारताचे संविधान लागू करून मी सरदार पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. जो देश (पाकिस्तान) कधी दहशतवाद्यांची निर्यात करत होता, तो आता आट्याच्या आयातीसाठी दारोदारी भटकत आहे. ज्याच्या हातात बॉम्ब असायचा, आता त्याच्या हातात भिक्षापात्र असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत. इकडे काँग्रेस कमकुवत होत असताना तेथे पाकिस्तान रडत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.


Home महत्वाची बातमी निवडणूक प्रचारात ‘पाकिस्तान’ची एंट्री
निवडणूक प्रचारात ‘पाकिस्तान’ची एंट्री
पाकिस्तानच्या नेत्याला राहुल गांधांची भुरळ : मोदींकडून उपरोधिक टीका मोदींना रोखणे आवश्यक : पाकिस्तानी नेत्याने राहुल गांधींचे केले कौतुक इस्लामाबाद : भारतात लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. अशास्थितीत आता पाकिस्तानचीही निवडणुकीच्या प्रचारात एंट्री झाली आहे. पाकिस्तानकडून भारतातील निवडणुकीवरून वक्तव्ये सुरू झाली आहेत. पाकिस्तानचे माजी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे […]