क्रेडाई बेल्कॉन-ऑटो एक्स्पो प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही बेळगावसह परिसरातील नागरिकांची तुफान गर्दी : बांधकाम साहित्य अन् अंतर्गत वस्तूंचे सर्वात मोठे प्रदर्शन
बेळगाव : सीपीएड मैदानावर गुऊवारपासून सुरू झालेल्या क्रेडाईच्या बेल्कॉन या घरबांधणी संदर्भातील वस्तू प्रदर्शनास आणि यश कम्युनिकेशन्स आयोजित ऑटो एक्स्पो प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. क्रेडाईतर्फे आयोजित करण्यात आलेले हे सातवे प्रदर्शन आहे. प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही बेळगावसह परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. क्रेडाई बेळगावने बांधकाम उद्योगातील महिलांना सक्षम करण्यासाठी महिला विंग सुरू केलेला आहे. 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान रिअल इस्टेट मालमत्ता, बांधकाम साहित्य आणि अंतर्गत वस्तूंचे हे सर्वात मोठे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. क्रेडाई महिला विंगने शुक्रवारी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. आर्किटेक्चर आणि सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी फसाड मॉडेल बनवण्याची आणि सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जैन कॉलेज, अंगडी कॉलेज, एसजीबीआयटी कॉलेज, गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आणि मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
ऑटो कॅड सॉफ्टवेअरवर बिल्डिंग डिझाईनचे अनोखे मॉडेल सादर
स्पर्धेचे परीक्षक म्हणून आर्किटेक्ट पद्मा संगोळ्ळी आणि वेदवती पाटील यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी ऑटो कॅड सॉफ्टवेअरवर बिल्डिंग डिझाईनचे अनोखे मॉडेल आणि टिकाऊ संकल्पना सादर केल्या. या स्पर्धेचे नियोजन महिला विंगच्या आर्किटेक्ट कऊणा हिरेमठ, इंजिनिअर अनुश्री बैलूर, आर्किटेक्ट सायली अकणोजी आणि सुकून नूरानी यांनी केले.
हँड्स ऑन रेझिन आर्ट वर्कशॉपचे आयोजन
हँड्स ऑन रेझिन आर्ट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राखी वोहरा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत 45 हून अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. चिन्मयी बैलवाड, लक्ष्मी पाटील आणि रेश्मा पोरवाल यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
आज विविध स्पर्धा
शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी चौथी, पाचवी आणि सहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी दुपारी 3 वा. ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ’मिले सूर मेरा तुम्हारा ’या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5:30 वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा पालक व मूल आणि आजोबा व नातू अशा 2 पिढीसाठी होणार आहे. क्रेडाईच्या महिला विंगने या संपूर्ण कार्यक्रमाला भरघोस पाठिंबा दिला आहे. समन्वयक दीपा वांडकर आणि सचिव कऊणा हिरेमठ महिला विंग यांनी संपूर्ण नियोजन केले आहे. सर्व बेळगावकरांनी या स्पर्धामध्ये सहभागी व्हावे तसेच प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर, सेव्रेटरी युवराज हुलजी व इव्हेंट चेअरमन आनंद अकणोजी यांनी केले आहे.
Home महत्वाची बातमी क्रेडाई बेल्कॉन-ऑटो एक्स्पो प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रेडाई बेल्कॉन-ऑटो एक्स्पो प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही बेळगावसह परिसरातील नागरिकांची तुफान गर्दी : बांधकाम साहित्य अन् अंतर्गत वस्तूंचे सर्वात मोठे प्रदर्शन बेळगाव : सीपीएड मैदानावर गुऊवारपासून सुरू झालेल्या क्रेडाईच्या बेल्कॉन या घरबांधणी संदर्भातील वस्तू प्रदर्शनास आणि यश कम्युनिकेशन्स आयोजित ऑटो एक्स्पो प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. क्रेडाईतर्फे आयोजित करण्यात आलेले हे सातवे प्रदर्शन आहे. प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही बेळगावसह परिसरातील […]