इंग्लंडचे विंडीजला 393 धावांचे आव्हान
रुट, ब्रुक यांची दमदार शतके : सिल्सचे 4 बळी
वृत्तसंस्था/ नॉटींगहॅम
येथे सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंडने विंडीजला निर्णायक विजयासाठी 393 धावांचे कठीण आव्हान दिले आहे. दरम्यान जो रुट आणि हॅरी ब्रुक यांची दमदार शतके तसेच डकेट आणि पॉप यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 425 धावा झळकाविल्या. विंडीजच्या सिलेसने 4 गडी बाद केले.
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी डावाने जिंकून विंडीजवर आघाडी मिळवली आहे. मात्र या दुसऱ्या कसोटीत विंडीजच्या फलंदाजीत चांगलीच सुधारणा झाल्याचे दिसून आले. इंग्लंडने या कसोटीत पहिल्या डावात 416 धावा जमविल्यानंतर विंडीजने त्यांना चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 457 धावा करत 32 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर इंग्लंडने 3 बाद 248 या धावसंख्येवरुन रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव चहापानावेळी 425 धावांवर आटोपला.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावामध्ये रुटने 178 चेंडूत 10 चौकारांसह 122 तर ब्रुकने 132 चेंडूत 13 चौकारांसह 109 धावा जमविल्या. सलामीच्या डकेटने 92 चेंडूत 11 चौकारांसह 76 तर पॉपने 67 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावा केल्या. अॅटकिनसनने 3 चौकारांसह नाबाद 21 धावा जमविल्या. डकेट आणि पॉप यांनी दुसऱ्या गड्यासाठी 109 धावांची भागिदारी केली. त्यानंतर ब्रुक आणि रुट यांनी चौथ्या गड्यासाठी 189 धावांची भागिदारी केल्याने इंग्लंडला 425 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडच्या शेवटच्या 7 फलंदाजांनी 177 धावांची भर घातली. रविवारी उपहारावेळी इंग्लंडने 6 बाद 348 धावा जमविल्या होत्या. विंडीजने यानंतर दुसरा नवा चेंडू घेतला. रुटने 158 चेंडूत 17 चौकारांच्या मदतीने तर ब्रुकने 118 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने शतक झळकाविले. विंडीजतर्फे सिलेसने 97 धावांत 4 तर अलझारी जोसेफने 103 धावांत 2 तसेच शमार जोसेफ, होल्डर आणि सिंक्लेयर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड प. डाव 416, विंडीज प. डाव 457, इंग्लंड दु. डाव 92.2 षटकात सर्व बाद 425 (रुट 122, ब्रुक 109, डकेट 76, पॉप 51, अॅटकिंसन नाबाद 21, सिलेस 4-97, अल्झारी जोसेफ 2-103, शमार जोसेफ, होल्डर, सिंक्लेयर प्रत्येकी 1 बळी).
Home महत्वाची बातमी इंग्लंडचे विंडीजला 393 धावांचे आव्हान
इंग्लंडचे विंडीजला 393 धावांचे आव्हान
रुट, ब्रुक यांची दमदार शतके : सिल्सचे 4 बळी वृत्तसंस्था/ नॉटींगहॅम येथे सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंडने विंडीजला निर्णायक विजयासाठी 393 धावांचे कठीण आव्हान दिले आहे. दरम्यान जो रुट आणि हॅरी ब्रुक यांची दमदार शतके तसेच डकेट आणि पॉप यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 425 धावा झळकाविल्या. विंडीजच्या […]