इंग्लंड महिला संघाचा 56 धावांनी विजय
वृत्तसंस्था /हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंड आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 56 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या टॅमी ब्यूमाँटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. इंग्लंडचा डाव 49 षटकात 252 धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 45 षटकात 196 धावांत समाप्त झाल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. इंग्लंडच्या डावामध्ये ब्यूमाँटने 96 चेंडूत 9 चौकारांसह 81, अॅमी जोन्सने 40 चेंडून 7 चौकारांसह 48, कर्णधार हीदर नाईटने 43 चेंडूत 4 चौकारांसह 37, बाऊचरने 3 चौकारांसह 20, केटी क्रॉसने 25 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 20, इक्लेस्टोनने 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावा जमवल्या. ब्यूमाँट आणि नाईट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. अॅमी जोन्स आणि क्रॉस यांनी 9 गड्यासाठी 55 धावांची भर घातली. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 26 चौकार नोंदविले. न्यूझीलंडतर्फे जेस केर, ताहुहू, बेट्स, जोनास यांनी प्रत्येकी 2 तर अॅमेलिया केर व रो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात हॅलीडेने 90 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 57, गेझीने 48 चेंडूत 3 चौकारासह 47, बेट्सने 4 चौकारासह 28, अॅमेलिया केरने 1 चौकारासह 14, रोने 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. इंग्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड 49 षटकात सर्वबाद 252 (ब्यूमाँट 81, बाऊचर 20, नाईट 37, जोन्स 48, इक्लेस्टोन 14, क्रॉस नाबाद 20, अवांतर 15, जेस केर, ताहुहू, जोनास, बेट्स प्रत्येकी 2 बळी, अॅमेलिया केर, रो प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 45 षटकात सर्वबाद 196 (हॅलिडे 57, गेझ 47, अॅमेलिया केर 14, बेट्स 28, रो 16 अवांतर 12, नॅट सिव्हर ब्रंट 3-21, क्रॉस, बेल, इक्लेस्टोन, डीन प्रत्येकी 1 बळी).
Home महत्वाची बातमी इंग्लंड महिला संघाचा 56 धावांनी विजय
इंग्लंड महिला संघाचा 56 धावांनी विजय
वृत्तसंस्था /हॅमिल्टन यजमान न्यूझीलंड आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 56 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या टॅमी ब्यूमाँटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. इंग्लंडचा डाव […]