पहिल्या कसोटीवर इंग्लंडची मजबूत पकड
विंडीजचा 121 धावांत खुर्दा, इंग्लंडला 250 धावांची आघाडी, अॅटकिन्सनचे सात बळी, इंग्लंडच्या पाच जणांची अर्धशतके
वृत्तसंस्था /लंडन
यजमान इंग्लंड आणि विंडीज यांच्यात येथील लॉर्डस् मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत विंडीजला पहिल्या डावात 121 धावांत उखडून इंग्लंडने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. इंग्लंडचा पहिला डाव गुरूवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी चहापानावेळी 371 धावांवर आटोपल्याने इंग्लंडने विंडीजवर पहिल्या डावात 250 धावांची आघाडी मिळविली. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा पहिला डाव 41.4 षटकात 121 धावांत आटोपला. इंग्लंडचा गोलंदाज अॅटकिन्सनने 45 धावांत 7 बळी मिळविले. कसोटी क्रिकेटमध्ये अॅटकिन्सनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. विंडीजच्या डावामध्ये लुईसने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27, अथांजेने 3 चौकारांसह 23, हॉजने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24, जोसेफने 4 चौकारांसह 17, मोतीने 3 चौकारांसह नाबाद 14 धावा जमविल्या. अॅटकिन्सनने 7 गडी बाद केले असून अॅन्डरसन, वोक्स आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरूवात केली. पहिल्या दिवसअखेर त्यांनी 3 बाद 189 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन इंग्लंडने गुरूवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 90 षटकात 371 धावांत आटोपला. इंग्लंडच्या उर्वरित सात गड्यांनी 182 धावांची भर घातली. इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये पाच फलंदाजांनी अर्धशतके झळकविली. सलामीच्या क्रॉलेने 89 चेंडूत 14 चौकारांसह 76, पोपने 74 चेंडूत 11 चौकारांसह 57, रूटने 114 चेंडूत 7 चौकारांसह 68, ब्रुकने 64 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 50, तर पदार्पणवीर जेमी स्मिथने 119 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 70 धावा झळकविल्या. वोक्सने 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. विंडीजतर्फे सिल्सने 77 धावांत 4, होल्डर आणि मोती यांनी प्रत्येकी 2, जोसेफने 1 गडी बाद केला. क्रॉले आणि पोप या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी केली. ब्रुक आणि रुट यांनी चौथ्या गड्यासाठी 93 धावांची भर घातली.
संक्षिप्त धावफलक : विंडीज प. डाव 41.4 षटकात सर्व बाद 121 (लुईस 27, अथांजे 23, हॉज 24, जोसेफ 17, मोती नाबाद 14, अॅटकिन्सन 7-45, अॅन्डरसन, वोक्स, स्टोक्स प्रत्येकी 1 बळी)
इंग्लंड प. डाव 90 षटकात सर्व बाद 371 (क्रॉले 76, पोप 57, रुट 68, ब्रुक 50, स्मिथ 70, वोक्स 23, अवांतर 20, सिल्स 4-77, होल्डर 2-58, मोती 2-41, जोसेफ 1-106)


Home महत्वाची बातमी पहिल्या कसोटीवर इंग्लंडची मजबूत पकड
पहिल्या कसोटीवर इंग्लंडची मजबूत पकड
विंडीजचा 121 धावांत खुर्दा, इंग्लंडला 250 धावांची आघाडी, अॅटकिन्सनचे सात बळी, इंग्लंडच्या पाच जणांची अर्धशतके वृत्तसंस्था /लंडन यजमान इंग्लंड आणि विंडीज यांच्यात येथील लॉर्डस् मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत विंडीजला पहिल्या डावात 121 धावांत उखडून इंग्लंडने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. इंग्लंडचा पहिला डाव गुरूवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी चहापानावेळी 371 धावांवर आटोपल्याने इंग्लंडने विंडीजवर […]