20 वर्षीय क्रिकेट खेळाडूचे निधन

फिरकीपटू जोश बेकर यांचे वयाच्या 20 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती इंग्लंड काउंटी चॅम्पियनशिप संघाने दिली आहे. त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्याने सामन्यात इतर संघाचे तीन विकेट घेतल्या होत्या. जोश यांच्या आकस्मिक निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा …

20 वर्षीय क्रिकेट खेळाडूचे निधन

फिरकीपटू जोश बेकर यांचे वयाच्या 20 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती इंग्लंड काउंटी चॅम्पियनशिप संघाने दिली आहे. त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्याने सामन्यात इतर संघाचे तीन विकेट घेतल्या होत्या. जोश यांच्या आकस्मिक निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. 

 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अनेकवेळा फोनचे उत्तर न मिळाल्याने जोशचा मित्र त्याच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला जिथे तो मृतावस्थेत आढळून आला. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. जोश वोस्टरशायर काउंटीकडून खेळला.

 

काउंटी क्लबने एका निवेदनात म्हटले आहे, की 

जोश बेकरचे अकाली निधन झाल्याची घोषणा करताना वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबला दु:ख झाले आहे. एक फिरकी गोलंदाज म्हणून त्याच्या कौशल्यापेक्षाही, त्याच्या चैतन्यशील भावना आणि उत्साहामुळे त्याला भेटलेल्या सर्वांना आवडायचे.

 

जोश वयाच्या 17 व्या वर्षी वूस्टरशायरमध्ये रुजू झाला. बेकरने 2021 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 47 सामने खेळले. त्याने एकूण 70 विकेट घेतल्या आहेत.

 

जोश बेकरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण मे 2022 मध्ये आला. त्याचा सामना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सशी झाला. स्टोक्सने 88 चेंडूत 161 धावा केल्या. यामध्ये बेनने बेकरच्या षटकात पाच षटकार आणि एक चौकार लगावला. यानंतर बेन स्टोक्सने त्याला मेसेज केला. की तुमच्याकडे क्षमता आहे आणि मला वाटते की तुम्ही खूप पुढे जाल.

 

Worcestershire County Cricket Club is heartbroken to announce the untimely passing of Josh Baker, who was aged only 20 years old.

The love and prayers of everyone at the Club go out to Josh’s family and friends at this time.

➡️ https://t.co/p5C9G0apV0 pic.twitter.com/DNNOnG4Gy7
— Worcestershire CCC (@WorcsCCC) May 2, 2024

जुलै 2023 मध्ये, जोशने ग्लॉस्टरशायरविरुद्ध 75 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. त्याने दोन अर्धशतके झळकावून आपल्या गोलंदाजीचे कौशल्यही दाखवून दिले. एप्रिलमध्येच जोश बेकरने वॉर्सेस्टरकडून डरहॅमविरुद्ध शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता.