बेनकनहळ्ळी महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची सांगता
यात्राकाळात भाविकांची अलोट गर्दी : शांततेत यात्रा यशस्वी : समाज प्रबोधनावर आधारित कार्यक्रमही सादर
वार्ताहर /हिंडलगा
बेनकनहळ्ळी, गणेशपूर, ज्योतीनगर या गावच्या महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची सांगता बुधवार दि. 1 मे रोजी सूर्यास्तावेळी मोठ्या भक्तिभावात व अलोट गर्दीत झाली. गेले आठ दिवस भंडाऱ्याच्या उधळणीत, ढोल-ताशा, पारंपरिक वाद्य व सुळगा (हिंडलगा) येथील धनगरांच्या ढोलपथकाने दररोज यात्रोत्सवाला रंगत आणली होती. लक्ष्मीदेवीचा जयजयकार करत सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. बेनकनहळ्ळी, गणेशपूर, क्रांतीनगर, शिवनेरी कॉलनी, चोपडे ले आऊट, सरस्वतीनगर, गंगानगर, क्रांतीनगर या भागातील सुवासिनींकडून दररोज ओटी भरण्याचे कार्यक्रम संपन्न झाले. तब्बल 33 वर्षांनी भरविण्यात आलेली यात्रा न भूतो न भविष्यती, अशा स्वरुपात शांततेत पार पडल्यामुळे भाविक यात्रा कमिटी व ग्रामस्थांचे अभिनंदन करत होते. या यात्रा कालावधीत धार्मिक कार्यक्रमासाठी वेदशास्त्र संपन्न राजू कुलकर्णी (हलकर्णी), वेदमूर्ती दीपक आर. कुलकर्णी, रोहित आर. कुलकर्णी उपस्थित राहत होते. दररोज पूजेच्या ठिकाणी मनोहर सुतार, अनंत सुतार, देमाण्णा सुतार, राजू सुतार, शंकर सुतार, विनोद सुतार, गजानन सुतार यांच्या घराण्याकडे पूजा करण्याचा मान असल्याने सूर्योदयापासून रात्रीपर्यंत उपस्थित राहून पूजा करून भाविकांना प्रसाद देण्याचे काम करत होते. बुधवार दि. 1 रोजी सकाळच्या सत्रात महाआरती, पूजा-अर्चा करण्यात आली. संध्याकाळी चार वाजता महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात आले. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
मंगळवार दि. 30 रोजी रात्री शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांच्या पोवाड्याला गर्दी झाली होती. गदगेच्या बाजूला खास बनविलेल्या व्यासपीठावर हा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. यावेळी ढोलकी वादक धोंडिबा काळे, हार्मोनियम विठ्ठल कलखांबकर, कोरस अभिजीत लोहार, मंथन निळकंठाचे, मंदा निळकंठाचे, शांता देवगेकर, शाहीर सूरज बिर्जे व बालशाहीर अद्विता देवगेकर, स्वरांजली देवगेकर, ज्योती निळकंठाचे यांचा समावेश होता. सह्याद्रीचा सिंह गरजतो यावर आधारित गणेशगीत, पावनखिंड पोवाडा, अफजल खानचा वध, स्त्राrभ्र्रूण हत्या (बेटी बचाव) अशा पद्धतीने समाज प्रबोधनावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले. या पोवाड्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन यात्रा कमिटीमार्फत करण्यात आले. यात्राकाळात हेस्कॉममार्फत अत्यंत जबाबदारीने व चोखपणे कामगिरी केल्याने शामियान्यात शाल, श्रीफळ, पानविडा देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवनेरी कॉलनी, चोपडे ले आऊट या विभागातून एकत्रपणे ओटी भरण्यात आली. या भागातील नलिनी चोपडे, राजश्री पाटील, कांचन चौगुले, भुत्तेवाडकर व या भागातील यात्रा कमिटीचे सल्लागार बाळासाहेब चोपडे आदींचा समावेश होता. महालक्ष्मीदेवी सीमेकडे जाण्यापूर्वी शामियान्यासमोर संध्याकाळपर्यंत खेळविण्यात आली. यावेळी मोठा जल्लोष होता. भाविकांच्या जयजयकारात महालक्ष्मीदेवी सीमेकडे प्रयाण झाली. यात्रा कमिटीने अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत यात्रा यशस्वी केली.
Home महत्वाची बातमी बेनकनहळ्ळी महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची सांगता
बेनकनहळ्ळी महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची सांगता
यात्राकाळात भाविकांची अलोट गर्दी : शांततेत यात्रा यशस्वी : समाज प्रबोधनावर आधारित कार्यक्रमही सादर वार्ताहर /हिंडलगा बेनकनहळ्ळी, गणेशपूर, ज्योतीनगर या गावच्या महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची सांगता बुधवार दि. 1 मे रोजी सूर्यास्तावेळी मोठ्या भक्तिभावात व अलोट गर्दीत झाली. गेले आठ दिवस भंडाऱ्याच्या उधळणीत, ढोल-ताशा, पारंपरिक वाद्य व सुळगा (हिंडलगा) येथील धनगरांच्या ढोलपथकाने दररोज यात्रोत्सवाला रंगत आणली होती. […]