कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक सुरू आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला असून पाच दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. किमान चार दहशतवाद्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून पाचवा …

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक सुरू आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला असून पाच दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. किमान चार दहशतवाद्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून पाचवा दहशतवादीही मारला गेल्याची माहिती आहे. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफसह संयुक्त दले ही कारवाई करत आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांना दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील मोदरगाम गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट सफरचंदाच्या बागेत असलेल्या घरात दहशतवादी लपले होते. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला, त्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या चकमकीत लष्कराच्या एका जवानाला गोळी लागली आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अमरनाथ यात्रा सुरू असतानाच ही चकमक होत आहे.

Edited by – Priya Dixit  

 

 

Go to Source