‘डॉन 3’मध्ये दिसणार इम्रान हाशमी

अभिनेता इम्रान हाश्मी अलिकडेच टायगर 3 या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसून आला असून यातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. तर इम्रान आता फरहान अख्तरचा आगामी चित्रपट ‘डॉन 3’चा हिस्सा होणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारणर आहे. परंतु निर्माते आणि अभिनेत्याकडून यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. इम्रान अलिकडेच फरहान अख्तरच्या कार्यालयात दिसून […]

‘डॉन 3’मध्ये दिसणार इम्रान हाशमी

अभिनेता इम्रान हाश्मी अलिकडेच टायगर 3 या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसून आला असून यातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. तर इम्रान आता फरहान अख्तरचा आगामी चित्रपट ‘डॉन 3’चा हिस्सा होणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारणर आहे. परंतु निर्माते आणि अभिनेत्याकडून यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. इम्रान अलिकडेच फरहान अख्तरच्या कार्यालयात दिसून आला आहे. डॉन 3 चा फर्स्ट लुक मागील वर्षी शेअर करण्यात आला होता. मूळ ‘डॉन’ चित्रपटात अमिताभ बच्चन दिसून आले होते. त्यांनी स्वत:ची संवादफेक आणि अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. यानंतर शाहरुख खान हा डॉनच्या रिमेकमध्ये दिसून आला होता. डॉन 2 या चित्रपटातही तोच मुख्य भुमिकेत होता. आता डॉन 3 या चित्रपटावरून चर्चा होत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारणार आहे. तर निर्मात्यांनी नायिकेचे नाव अद्याप निश्चित केलेले नाही. इम्रान लवकरच पवन कल्याण यांच्या ‘ओजी’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाद्वारे इम्रान हा तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट एक गँगस्टर ड्रामा धाटणीचा आहे.