‘ग्राउंड झिरो’मध्ये इम्रान हाशमी

बीएसएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारणार अमेझॉन प्राइम व्हिडिओने अलिकडेच 69 चित्रपट आणि वेबसीरिजची घोषणा केली आहे. यातील काही प्रोजेक्ट यंदा तर काही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. याचपैकी एक आहे इम्रान हाशमीचा ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट. प्राइम व्हिडिओने याची अधिकृत घोषणा केली आहे. इम्रान यात एका बीएसएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. चित्रपटात इम्रान एक […]

‘ग्राउंड झिरो’मध्ये इम्रान हाशमी

बीएसएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारणार
अमेझॉन प्राइम व्हिडिओने अलिकडेच 69 चित्रपट आणि वेबसीरिजची घोषणा केली आहे. यातील काही प्रोजेक्ट यंदा तर काही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. याचपैकी एक आहे इम्रान हाशमीचा ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट. प्राइम व्हिडिओने याची अधिकृत घोषणा केली आहे.
इम्रान यात एका बीएसएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. चित्रपटात इम्रान एक धोकादायक मिशन राबवत असल्याचे दाखविले जाईल. संवेदनशील स्थिती सांभाळण्यासाठी काश्मीरमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याची ही भूमिका असणार आहे.
हा चित्रपट फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंटकडून निर्माण केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय देवस्कर आणि तेजस प्रभा करणार आहेत.
इम्रान अलिकडेच ‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटात दिसून आला आहे. यात त्याने राम मनोहर लोहिया यांची भूमिका साकारली आहे. इम्रानचा यातील लुक चाहत्यांना पसंत पडला आहे. याचबरोबर इम्रान हा टायगर 3 या चित्रपटात सलमान खानसोबत दिसून आला होता.