बसुर्ते, बेकिनकेरे भागात पुन्हा हत्तीचे दर्शन

रात्री घडल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांची धावपळ : वनअधिकाऱ्यांनी दखल घ्यावी वार्ताहर /उचगाव बसुर्ते, बेकिनकेरे या परिसरात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमाराला पुन्हा हत्ती आल्याचे शेतवडीतील पिकांना पाणी देताना काही शेतकऱ्यांनी या हत्तीला पाहिल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली आणि  शेतकरी पळत घरी आल्याच्या घटना घडल्या आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांचा बळी गेल्यास याला वनखाते […]

बसुर्ते, बेकिनकेरे भागात पुन्हा हत्तीचे दर्शन

रात्री घडल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांची धावपळ : वनअधिकाऱ्यांनी दखल घ्यावी
वार्ताहर /उचगाव
बसुर्ते, बेकिनकेरे या परिसरात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमाराला पुन्हा हत्ती आल्याचे शेतवडीतील पिकांना पाणी देताना काही शेतकऱ्यांनी या हत्तीला पाहिल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली आणि  शेतकरी पळत घरी आल्याच्या घटना घडल्या आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांचा बळी गेल्यास याला वनखाते जबाबदार असेल असा इशाराही शेतकऱ्यांतर्फे देण्यात आला आहे. बसुर्ते येतील शेतकरी पुंडलिक मोरे व इतर काही शेतकरी पिकांना पाणी देत असताना या हत्तीचे त्यांना दर्शन घडले. यावेळी डोंगरे, कदम यांनी या हत्तीचा लांबून फोटोही घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेकिनकेरे शेतवाडीमध्ये काही धनगर लोक आपल्या मेंढरासह ठाण मांडून बसले होते. यावेळी कुत्र्यांचा भुंकण्याच्या जोरदार आवाज त्यांनी एकला तर हत्ती असल्याचे त्यांना आढळून आले. एकंदरीत या भागामध्ये सदर हत्तीचा अद्याप वावर असून दिवसभर कोठेतरी झाडाझुडपामध्ये हा हत्ती लपून बसत असून रात्रीच्यावेळी त्याचा पुन्हा संचार सर्वत्र सुरू आहे. तरी तातडीने या हत्तीचा बंदोबस्त वनखात्याने करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
वीजपुरवठा वेळेत बदल करण्याची गरज
शेतकऱ्यांवरील संकट टाळण्यासाठी हेस्कॉमने आपल्या थ्रीपेज विद्युत पुरवठ्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. शेतामध्ये रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने धोक्याचे असल्याने विद्युत पुरवठा सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत द्यावा अशी मागणी पुन्हा पुन्हा करण्यात येत आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांवर अशा प्रकारच्या जंगली प्राण्यांने हल्ला केला अन् त्याला धोका झाला तर याला हेस्कॉम खाते जबाबदार राहील. असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.