मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती होणार

विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पहिल्यांदाच समुद्राच्या लाटांवर वीज तयार होणार आहे. केंद्र सरकारी भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने (BPCL) यासाठी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत इस्रालयमधील कंपनीच्या सहकार्याने पहिला पायलट प्रकल्प मुंबईत उभा होणार आहे. दिल्लीतील (delhi) आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन केंद्रात सुरू असलेल्या ‘इंडिया एनर्जी वीक’मध्ये देशाच्या वाढत्या इंधन व ऊर्जा गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक व स्वच्छ ऊर्जेसंबंधी चर्चा सुरू आहे. त्याअंतर्गतच ‘बीपीसीएल’ने समुद्रासारख्या (sea) अमाप प्रमाणात उपलब्ध असलेल्या ऊर्जास्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मितीसाठी नियोजन सुरू केले आहे. याअंतर्गत ‘बीपीसीएल’ लवकरच इस्रायलच्या ‘इको वेव्ह पॉवर’ या कंपनीशी सामंजस्य करार करणार आहे. त्या माध्यमातून समुद्राच्या लाटांपासून 100 किलोवॉट वीज तयार करणारा पायलट प्रकल्प मुंबईच्या (mumbai) समुद्रकिनारी उभा होणार आहे. ‘इको वेव्ह पॉवर’ (Eco wave power) ही या क्षेत्रात असा प्रकल्प यशस्वीपणे सिद्ध केलेली कंपनी आहे. त्यामुळेच हा सामंजस्य करार महत्त्वाचा असून ‘इंडिया एनर्जी वीक’मध्येच आज, अखेरच्या दिवशी हा करार होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. इस्रालयच्या तेल अवीव येथे मुख्यालय असलेल्या ‘इको वेव्ह पॉवर’ने इस्रायलसह जिब्राल्टर व पोर्तुगालमध्ये तब्बल पाच ते 20 मेगावॉट क्षमतेचे लाटांवर आधारित वीजप्रकल्प यशस्वीपणे सुरू केले आहेत. त्यांच्या याच तंत्रज्ञानाद्वारे मुंबईतील पायलट प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत ‘बीपीसीएल’च्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.हेही वाचा बेकायदा रिक्षा चालकांविरूद्ध रिक्षा संघटनाचे आंदोलन ठाणे : रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेर वाहनांना प्रवेशबंदी

मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती होणार

विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पहिल्यांदाच समुद्राच्या लाटांवर वीज तयार होणार आहे. केंद्र सरकारी भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने (BPCL) यासाठी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत इस्रालयमधील कंपनीच्या सहकार्याने पहिला पायलट प्रकल्प मुंबईत उभा होणार आहे.दिल्लीतील (delhi) आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन केंद्रात सुरू असलेल्या ‘इंडिया एनर्जी वीक’मध्ये देशाच्या वाढत्या इंधन व ऊर्जा गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक व स्वच्छ ऊर्जेसंबंधी चर्चा सुरू आहे. त्याअंतर्गतच ‘बीपीसीएल’ने समुद्रासारख्या (sea) अमाप प्रमाणात उपलब्ध असलेल्या ऊर्जास्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मितीसाठी नियोजन सुरू केले आहे.याअंतर्गत ‘बीपीसीएल’ लवकरच इस्रायलच्या ‘इको वेव्ह पॉवर’ या कंपनीशी सामंजस्य करार करणार आहे. त्या माध्यमातून समुद्राच्या लाटांपासून 100 किलोवॉट वीज तयार करणारा पायलट प्रकल्प मुंबईच्या (mumbai) समुद्रकिनारी उभा होणार आहे. ‘इको वेव्ह पॉवर’ (Eco wave power) ही या क्षेत्रात असा प्रकल्प यशस्वीपणे सिद्ध केलेली कंपनी आहे. त्यामुळेच हा सामंजस्य करार महत्त्वाचा असून ‘इंडिया एनर्जी वीक’मध्येच आज, अखेरच्या दिवशी हा करार होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.इस्रालयच्या तेल अवीव येथे मुख्यालय असलेल्या ‘इको वेव्ह पॉवर’ने इस्रायलसह जिब्राल्टर व पोर्तुगालमध्ये तब्बल पाच ते 20 मेगावॉट क्षमतेचे लाटांवर आधारित वीजप्रकल्प यशस्वीपणे सुरू केले आहेत. त्यांच्या याच तंत्रज्ञानाद्वारे मुंबईतील पायलट प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत ‘बीपीसीएल’च्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.हेही वाचाबेकायदा रिक्षा चालकांविरूद्ध रिक्षा संघटनाचे आंदोलनठाणे : रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेर वाहनांना प्रवेशबंदी

Go to Source