‘गृहज्योती’पूर्वीची वीजबिले अद्याप थकीत
हेस्कॉमला तोटा : बिले भरण्याचे आवाहन
बेळगाव : राज्यात गृहज्योती योजना लागू होऊन एक वर्ष होत आले तरी अद्याप योजना लागू होण्यापूर्वी वापरलेल्या विजेचे बिल काही ग्राहकांकडून भरण्यात आलेले नाही. हेस्कॉमकडून वारंवार विनंती करूनदेखील अद्याप त्या वीजग्राहकांनी विद्युत बिल भरलेले नाही. हे बिल वेळेत न भरल्यास वीजपुरवठा तोडण्याचा इशारा हेस्कॉमकडून देण्यात आला आहे. 2023 मध्ये काँग्रेस सरकार सत्तेत येताच त्यांनी विद्युत ग्राहकांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची योजना राबविली. 1 ऑगस्टपासून राज्यातील ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळू लागला. परंतु, जून-जुलै-2023 मध्ये वापरलेल्या विजेची रक्कम अद्याप अनेक ग्राहकांनी भरलेली नाही. राज्य सरकारने ग्राहकांच्या सोयीसाठी गृहज्योती योजना लागू केली. परंतु, त्यापूर्वीची थकबाकी तरी भरण्याची विनंती हेस्कॉमकडून करण्यात येत आहे. गृहज्योती योजना लागू झाल्यापासून घरगुती ग्राहकांचे बिल कमी झाले आहे. काही ग्राहकांचे शून्य रुपये तर काहींचे अत्यल्प बिल येत आहे. योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक महिन्याला आलेले विद्युत बिल भरणे गरजेचे आहे. परंतु, बरेच ग्राहक विद्युत बिल भरत नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
ग्राहकांनी थकबाकी वेळेत भरावी
राज्यातील ग्राहकांना सरासरीनुसार 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात आली आहे. या योजनेचा विद्युत ग्राहक लाभ घेत आहेत. परंतु, योजना कार्यान्वित होण्यापूर्वीची थकबाकी अद्याप बाकी आहे. थकबाकी असल्याने हेस्कॉमला तोटा सहन करावा लागत असल्याने ग्राहकांनी थकबाकी वेळेत भरावी.
– संजीव हम्मण्णावर (साहाय्यक कार्यकारी अभियंता हेस्कॉम)
Home महत्वाची बातमी ‘गृहज्योती’पूर्वीची वीजबिले अद्याप थकीत
‘गृहज्योती’पूर्वीची वीजबिले अद्याप थकीत
हेस्कॉमला तोटा : बिले भरण्याचे आवाहन बेळगाव : राज्यात गृहज्योती योजना लागू होऊन एक वर्ष होत आले तरी अद्याप योजना लागू होण्यापूर्वी वापरलेल्या विजेचे बिल काही ग्राहकांकडून भरण्यात आलेले नाही. हेस्कॉमकडून वारंवार विनंती करूनदेखील अद्याप त्या वीजग्राहकांनी विद्युत बिल भरलेले नाही. हे बिल वेळेत न भरल्यास वीजपुरवठा तोडण्याचा इशारा हेस्कॉमकडून देण्यात आला आहे. 2023 मध्ये काँग्रेस सरकार सत्तेत येताच […]