स्थायी समिती अध्यक्ष निवड 9 रोजी

बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड मंगळवार दि. 9 रोजी केली जाणार आहे. स्थायी समित्यांच्या सदस्यांची निवड मंगळवारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता या सात नगरसेवकांतून एकट्याची अध्यक्षपदासाठी निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असून त्यांनी आपली वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महानगरपालिकेतील चार स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने त्याकडे साऱ्यांचेच […]

स्थायी समिती अध्यक्ष निवड 9 रोजी

बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड मंगळवार दि. 9 रोजी केली जाणार आहे. स्थायी समित्यांच्या सदस्यांची निवड मंगळवारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता या सात नगरसेवकांतून एकट्याची अध्यक्षपदासाठी निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असून त्यांनी आपली वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
महानगरपालिकेतील चार स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने त्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. सार्वजनिक बांधकाम, शिक्षण व आरोग्य स्थायी समिती, अर्थ व कर आणि लेखा स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. या प्रत्येक स्थायी समितीमध्ये सात सदस्य आहेत. त्यामधून एक सदस्य निवडला जाणार आहे.
महानगरपालिकेतील स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. पाच-दोन फॉर्म्युल्यानुसार ही बिनविरोध निवडणूक पार पडली. सत्ताधारी भाजपचे पाच नगरसेवक व विरोधी गटाचे दोन नगरसेवक अशा एकूण सात नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व स्थायी समित्यांवर भाजपचेच वर्चस्व असून भाजपचेच अध्यक्ष होणार आहेत. तसेच भाजपमधील नगरसेवकांनी स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.