महापौर-उपमहापौरपदासाठी आज होणार निवडणूक
मनपा अधिकारी सज्ज : सकाळी 9 वाजता प्रक्रियेला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी गुऊवार दि. 15 रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त राजेश्री जैनापुरे यांनी सभागृहात पाहणी करुन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यकत ती तयारी करण्याची सूचना त्यांनी केली. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता असल्यामुळे या निवडणुकीमध्ये म्हणावी तशी चुरस दिसत नाही. महापौरपद अनुसुचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे तर उपमहापौरपद सर्वसामान्य वर्गासाठी आहे. भाजपकडे महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक 17 मधील सविता कांबळे आणि 35 मधील लक्ष्मी राठोड असे दोन सदस्य आहेत. त्यामुळे या दोन सदस्यांमधील कोणत्या महिलेच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याबाबत भाजप नगरसेवकांमध्ये चर्चा रंगली आहे. तर उपमहापौर सर्वसामान्य वर्गांसाठी असल्याने भाजपमधील अनेक सदस्य इच्छुक आहेत. त्यामुळे या पदासाठी भाजपमधील नगरसेवकांमध्येच रस्सीखेच सुरू आहे. महानगरपालिकेवर भाजपचे 35 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे 10 नगरसेवक असून म. ए. समिती 3, अपक्ष 9, एआयएमआयएम 1 अशा प्रकारे एकूण 58 नगरसेवक आहेत. विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडे अपेक्षित संख्याबळ नसल्याने निवडणुकीमध्ये रंगत नसल्याचे दिसून येत आहे. मनपा अधिकाऱ्यांना केवळ औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
9 वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ
दि. 15 रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत महापौर-उपमहापौर पदासाठी नामपत्र दाखल करणे, दुपारी 1 वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. हजेरी घेऊन कोरम पाहणे, महापौरपदासाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामपत्रांची छाननी, त्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करणे, अर्ज माघारी घेणे, बिनविरोध निवड झाल्यास जाहीर करणे, अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यास हात उंचावून मतदान घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशीच प्रक्रिया उपमहापौरपदासाठीही घेतली जाणार आहे.
Home महत्वाची बातमी महापौर-उपमहापौरपदासाठी आज होणार निवडणूक
महापौर-उपमहापौरपदासाठी आज होणार निवडणूक
मनपा अधिकारी सज्ज : सकाळी 9 वाजता प्रक्रियेला प्रारंभ बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी गुऊवार दि. 15 रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त राजेश्री जैनापुरे यांनी सभागृहात पाहणी करुन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यकत ती तयारी करण्याची सूचना त्यांनी केली. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता असल्यामुळे या निवडणुकीमध्ये म्हणावी तशी […]