महाराष्ट्र मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिली प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election News: राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार आणि मतदान याद्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. आता यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया आली

महाराष्ट्र मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिली प्रतिक्रिया

 

Maharashtra Assembly Election News: राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार आणि मतदान याद्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. आता यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया आली आहे.   

ALSO READ: राहुल गांधींचा मोठा आरोप महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात तफावत, मतदार यादीतून अल्पसंख्याकांची नावे वगळली
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मतदार यादीतील अनियमिततेच्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने जोरदार हल्लाबोल केला आहे आणि या प्रकरणातील संपूर्ण तथ्यांसह उत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. आज राहुल गांधी यांनी दिल्लीत शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी-एससीपी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया आली.

तसेच महाराष्ट्रातील मतदारांची संख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना संपूर्ण तथ्यांसह लेखी उत्तर देईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Edited By- Dhanashri Naik

Go to Source