एकनाथ शिंदेंची शिवसेनाही भाजपसोबत एकत्रपणे निवडणूक लढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय …

एकनाथ शिंदेंची शिवसेनाही भाजपसोबत एकत्रपणे निवडणूक लढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला लागले आहे. या वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ALSO READ: नगरपालिका निवडणुकांच्या घोषणेला शिवसेना उबाठाचा आक्षेप, निवडणूक आयोगाला लिहिले पत्र

ते म्हणाले, राज्यात बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ALSO READ: ईव्हीएमवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी देखील याच मशीनने जिंकले
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र लढू शकणार नाहीत. याबाबत अजितदादांशी चर्चा झाली आहे. आम्ही एकत्र लढलो तर त्याचा फायदा विरोधकांना होईल. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उतरतील, मात्र ही लढत मैत्रीपूर्ण असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपसोबतच राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

ALSO READ: ठाकरे बंधूं एकत्र आल्याने फायदा महायुतीचा होणार, रामदास आठवले यांचे विधान

मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, की, थोड्या काही प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ असतो, ते आम्हीही दाखवलं आहे. पण त्यामुळे निवडणूकच घ्यायच्या नाहीत हे मत चुकीचं आहे. येत्या काळात एसआयआर प्रक्रियामुळे मतदार याद्यातील घोळ कमी होईल.

  Edited By – Priya Dixit 

 

Go to Source