देबाशिष साहूला ओडिशाचा एकलव्य पुरस्कार

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर युवा टेनिसपटू देबाशिष साहूला एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओडिशातर्फे दिला जाणारा हा सर्वात प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रशस्तिपत्र, ट्रॉफी व 5 लाख रुपये माजी महान क्रिकेटपटू मदन लाल यांच्या हस्ते येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रदान केले. एप्रिल 2021 ते […]

देबाशिष साहूला ओडिशाचा एकलव्य पुरस्कार

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
युवा टेनिसपटू देबाशिष साहूला एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओडिशातर्फे दिला जाणारा हा सर्वात प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
प्रशस्तिपत्र, ट्रॉफी व 5 लाख रुपये माजी महान क्रिकेटपटू मदन लाल यांच्या हस्ते येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रदान केले. एप्रिल 2021 ते मार्च 2023 या कालावधीतील साहूच्या कामगिरीचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. साहूप्रमाणे वेटलिफ्टर ज्योश्ना साबर व अॅथलीट बापी हंसदा यांनाही मानपत्र व 1 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात आले. एकलव्य पुरस्कार प्रतिवर्षी ओडिशाच्या युवा क्रीडापटूंना प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी मागील दोन वर्षाची कामगिरी विचारात घेण्यात येते.