राज्याच्या विकासासाठी मिळणार आठ हजार कोटी

दिल्लीतील बजेटपूर्व बैठकीत मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी प्रतिनिधी/ पणजी गोवा राज्याचा अंत्योदय सर्वांगीण विकास करणे हे आपले प्रमुख धोरण आहे. त्याच्या अनुषंगाने राज्याच्या विविध प्रकारच्या विकासकामांसाठी, सेंट झेवियर शवप्रदर्शनासाठी, रेल्वेंच्या विकासकामांसाठी, धरणे आणि जमिनीची धूप थांबवणे तसेच वीज खात्याच्या विकासासाठी केंद्राकडे 8 हजार कोटी ऊपयांची मागणी करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. […]

राज्याच्या विकासासाठी मिळणार आठ हजार कोटी

दिल्लीतील बजेटपूर्व बैठकीत मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
प्रतिनिधी/ पणजी
गोवा राज्याचा अंत्योदय सर्वांगीण विकास करणे हे आपले प्रमुख धोरण आहे. त्याच्या अनुषंगाने राज्याच्या विविध प्रकारच्या विकासकामांसाठी, सेंट झेवियर शवप्रदर्शनासाठी, रेल्वेंच्या विकासकामांसाठी, धरणे आणि जमिनीची धूप थांबवणे तसेच वीज खात्याच्या विकासासाठी केंद्राकडे 8 हजार कोटी ऊपयांची मागणी करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दिल्ली येथील जीएसटी कौन्सीलच्या बजेटपूर्व बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या विकासकामांसाठी कोट्यावधी ऊपयांचा निधी केंद्राकडून मिळणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील विकासकामांसाठी आठ हजार कोटींची मागणी आपण केली आहे. याशिवाय सेंट झेवियर शवप्रदर्शनासाठी, धरणे आणि जमिनीची धूप थांबवण्याच्या कामांसाठी, जुन्या वाहिन्या बदलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला (पीडब्लूडी) एक हजार कोटी, तर अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी वीज खात्याला एक हजार कोटी देण्याची मागणी केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अंत्योदय तत्त्वावर राज्याचा भरीव विकास सुरू आहे. केंद्रातील भाजप सरकारने गोव्यावर कधीच अन्याय होऊ दिला नाही. गोव्याचा भरीव विकास व्हावा यासाठी प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी सहकार्य केलेले आहे. जीएसटी कौन्सीलच्या बजेटपूर्व बैठकीत गोव्यातील समस्यांचे मुद्दे आपण प्रकर्षाने मांडलेले आहेत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
डॉ. प्रमोद सावंत यांनी रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवजी यांची भेट घेतली. दुसऱ्यां मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आणि राज्यातील रेल्वे नेटवर्क सुधारण्यासाठी त्यांचा सल्ला घेण्याबरोबरच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचीही भेट घेत त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याशी दीर्घ चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांनी गोव्याच्या विषयांवर दीर्घ चर्चा केली. बजेटपूर्व बैठकीनंतर त्यांनी सीतारामन यांच्याशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी गोव्याला यापुढेही सहकार्य मिळावे याविषयी अपेक्षा व्यक्त केली.
सुपरफास्ट रेल्वेचे जाळे विणणार
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, रेल्वेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच राज्यांतर्गत मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा आपला हेतू आहे. स्थानिक आणि पर्यटकांना फायदेशीर ठरणाऱ्या सुपरफास्ट रेल्वेंचे जाळे विणण्यासह भविष्यात पेडणे ते काणकोण आणि मोपा विमानतळाला जोडणाऱ्या राज्यांतर्गत मेट्रो सुरू करण्यासाठी साधनसुविधा उभारणे गरजेचे आहे. त्यासाठीच या निधीची मागणी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
या विकासकामांसाठी 8 कोटींची मागणी
अर्थसंकल्पपूर्व बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याची बाजू मांडताना सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी 8 हजार कोटी ऊपये, सेंट झेवियर शवप्रदर्शनासाठी 300 कोटी, रेल्वेच्या विकासकामांसाठी 5 हजार कोटी, धरणे आणि जमिनीची धूप थांबविण्याच्या कामांसाठी 700 कोटी तर अक्षय ऊर्जा निक्रिती व वीज खात्याच्या विकासासाठी 1 हजार कोटी ऊपये देण्याची मागणी केली.