पणजी ‘स्मार्ट सिटी’ची कामे 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न

पणजी : राजधानी पणजीत चालू असलेल्या स्मार्टसिटी कामांच्या विविध कंत्राटदारांची बैठक पणजी इमॅजिन डेव्हलपमेंट लि. कंपनीतर्फे घेण्यात आली आणि सर्व कंत्राटदारांना 31 मे पूर्वी कामे संपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्स यांनी बैठक बोलावली होती. त्यांनी पणजीतील स्मार्ट सिटीतील सध्या चालू असलेल्या कामांचा आढावा घेतला. प्रत्येक कंत्राटदारास त्यांची स्मार्ट […]

पणजी ‘स्मार्ट सिटी’ची कामे 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न

पणजी : राजधानी पणजीत चालू असलेल्या स्मार्टसिटी कामांच्या विविध कंत्राटदारांची बैठक पणजी इमॅजिन डेव्हलपमेंट लि. कंपनीतर्फे घेण्यात आली आणि सर्व कंत्राटदारांना 31 मे पूर्वी कामे संपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्स यांनी बैठक बोलावली होती. त्यांनी पणजीतील स्मार्ट सिटीतील सध्या चालू असलेल्या कामांचा आढावा घेतला. प्रत्येक कंत्राटदारास त्यांची स्मार्ट सिटीची कामे कधी संपणार? याची विचारणा करण्यात आली. काही कामे 31 मे पूर्वी होणे शक्य नाही, त्यासाठी जादा कालावधी लागणार असल्याचे कंत्राटदारांनी निदर्शनास आणले. त्यांनाही त्यांची कामे 31 मे पूर्वी संपवावीत, असे बजावण्यात आले आहे. पावसाळा ऐन तोंडावर आला असून तत्पूर्वी संपूर्ण कामे संपवणे आवश्यक आहे. वेळ कमी पडत असेल तर दोन ते तीन पाळ्यांमध्ये कामे करावीत असेही कंत्राटदारांना सांगण्यात आले आहे. बहुतेक कंत्राटदारांनी त्यास संमती दर्शवली आहे.