शैक्षणिक संस्थांनी प्रभातफेरी काढावी

भाजप नेते किरण जाधव यांचे आवाहन बेळगाव : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार आहे. हा आनंद अधिक द्विगुणित करावा, यासाठी सेवाभावी संघ, संस्था, शैक्षणिक संस्था यांनी आपल्या भागात भगव्या पताका लावून परिसर राममय करावा, शैक्षणिक संस्थांनी शाळेच्या परिसरात श्रीराम जय जय राम जय जय राम, असा जप करत […]

शैक्षणिक संस्थांनी प्रभातफेरी काढावी

भाजप नेते किरण जाधव यांचे आवाहन
बेळगाव : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार आहे. हा आनंद अधिक द्विगुणित करावा, यासाठी सेवाभावी संघ, संस्था, शैक्षणिक संस्था यांनी आपल्या भागात भगव्या पताका लावून परिसर राममय करावा, शैक्षणिक संस्थांनी शाळेच्या परिसरात श्रीराम जय जय राम जय जय राम, असा जप करत हाती भगवे ध्वज घेऊन प्रभातफेरी काढावी व वर्गांमधून हनुमान चालिसाचे पठण करावे, असे आवाहन कर्नाटक राज्य ओबीसीचे माजी सरचिटणीस व भाजप नेते किरण जाधव हे करत आहेत. या अनुषंगाने ते विविध शाळांना व संस्थांना भेट देत असून चालकांसमवेत चर्चा करत आहेत. महिलांनीसुद्धा प्रवेशद्वारासमोर रांगोळी घालावी, दरवाजाला तोरण बांधावे, पणत्या लावाव्यात, असेही आवाहन त्यांनी केले आहे.