ठाणे : ईडीकडून दाऊद इब्राहिमच्या भावाचा फ्लॅट जप्त

ईडीने (ED) कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील ‘निओपोलिस’ टॉवरमधील फ्लॅट ताब्यात (seize) घेतला आहे. एप्रिल 2022 मध्ये, ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हा फ्लॅट जप्त केला होता. ठाण्यातील (thane) कासारवडवली पोलीस ठाण्यात कासकरवर 2017 मध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या आधारे ईडी तपास करत आहे. त्यानंतर हे प्रकरण ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. कासकर आणि त्याचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार अली जमील यांनी दाऊद इब्राहिमच्या (dawood ibrahim) नावाचा फायदा घेऊन बिल्डर सुरेश मेहता यांच्याकडून मालमत्ता आणि रोख रक्कम उकळली. तसेच 10 लाख रुपयांचे व्यवहार बनावट चेकद्वारे दाखवण्यात आले. सुमारे 75 लाख रुपये किमतीचा फ्लॅट शेख यांच्या नावावर बळजबरीने हस्तांतरित करण्यात आला ईडीने या प्रकरणी दोन गुन्ह्यांच्या आधारे तपास सुरू केला होता. त्यात दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि इतरांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआरए) दाखल केलेला गुन्ह्याचा समावेश होता. तसेच इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणी स्वीकारल्याचा आणखी एक गुन्हा ठाणे पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये कासकरची चौकशी केली होती. त्यात त्याने दाऊदच्या भारतातल्या गुन्हेगारी कारवायांची माहिती दिली होती. तसेच आरोपींच्या घरांवर छापे टाकल्यानंतर एप्रिल 2022 च्या ठाणे पोलिसांच्या अहवालाच्या पुराव्यासह मनी लाँड्रींग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र (maharashtra) संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MoCCA) आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत खंडणी आणि कट रचण्याच्या संबंधित कलमांचा समावेश आहे. 2003 मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून हद्दपार झालेल्या इक्बाल कासकरने भारतात दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावण्यास आणि खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली होती. कराचीमध्ये राहणाऱ्या दाऊदचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट आणि गुप्तचर संस्थांशी संबंध असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे प्रकरण कायदेशीर आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अधिक महत्त्वाचे आहे. याशिवाय दाऊदच्या विविध कारवायांवर एनआयएने देशभरात कारवाई केली आहे.हेही वाचा 26-27 डिसेंबरला ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा बंद दर रविवारी क्रिडाप्रेमींसाठी पाम बीच खुला करणार

ठाणे : ईडीकडून दाऊद इब्राहिमच्या भावाचा फ्लॅट जप्त

ईडीने (ED) कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील ‘निओपोलिस’ टॉवरमधील फ्लॅट ताब्यात (seize) घेतला आहे. एप्रिल 2022 मध्ये, ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हा फ्लॅट जप्त केला होता. ठाण्यातील (thane) कासारवडवली पोलीस ठाण्यात कासकरवर 2017 मध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या आधारे ईडी तपास करत आहे. त्यानंतर हे प्रकरण ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. कासकर आणि त्याचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार अली जमील यांनी दाऊद इब्राहिमच्या (dawood ibrahim) नावाचा फायदा घेऊन बिल्डर सुरेश मेहता यांच्याकडून मालमत्ता आणि रोख रक्कम उकळली. तसेच 10 लाख रुपयांचे व्यवहार बनावट चेकद्वारे दाखवण्यात आले. सुमारे 75 लाख रुपये किमतीचा फ्लॅट शेख यांच्या नावावर बळजबरीने हस्तांतरित करण्यात आलाईडीने या प्रकरणी दोन गुन्ह्यांच्या आधारे तपास सुरू केला होता. त्यात दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि इतरांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआरए) दाखल केलेला गुन्ह्याचा समावेश होता. तसेच इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणी स्वीकारल्याचा आणखी एक गुन्हा ठाणे पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये कासकरची चौकशी केली होती. त्यात त्याने दाऊदच्या भारतातल्या गुन्हेगारी कारवायांची माहिती दिली होती. तसेच आरोपींच्या घरांवर छापे टाकल्यानंतर एप्रिल 2022 च्या ठाणे पोलिसांच्या अहवालाच्या पुराव्यासह मनी लाँड्रींग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र (maharashtra) संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MoCCA) आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत खंडणी आणि कट रचण्याच्या संबंधित कलमांचा समावेश आहे.2003 मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून हद्दपार झालेल्या इक्बाल कासकरने भारतात दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावण्यास आणि खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली होती. कराचीमध्ये राहणाऱ्या दाऊदचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट आणि गुप्तचर संस्थांशी संबंध असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे प्रकरण कायदेशीर आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अधिक महत्त्वाचे आहे. याशिवाय दाऊदच्या विविध कारवायांवर एनआयएने देशभरात कारवाई केली आहे.हेही वाचा26-27 डिसेंबरला ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा बंददर रविवारी क्रिडाप्रेमींसाठी पाम बीच खुला करणार

Go to Source