पश्चिम बंगालच्या मंत्र्यांवर ईडीचे छापे
40 लाख रोख रक्कम जप्त
वृत्तसंस्था/ कोलकाता
ईडीने बंगालच्या एका मंत्र्याच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. ईडीने शुक्रवारी ममता बॅनर्जी सरकारमध्ये लघू आणि कुटिरोद्योग मंत्री चंद्रनाथ सिन्हा यांच्या बोलपूर स्थित निवासस्थानी झडती घेतली आहे. शुक्रवारी रात्री ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक सिन्हा यांच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी राज्याचे मंत्री निवासस्थानी हजर नव्हते. ईडीच्या पथकाने 14 तासांपर्यंत चाललेल्या छाप्याच्या कारवाईत अनेक दस्तऐवज, मोबाइल फोन आणि 40 लाखाहून अधिक रोख रक्कम जप्त केली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली आहे.
कथित शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी तपास करत असून याच अंतर्गत सिन्हा यांच्या बोलपूर येथील निवासस्थानी छापे टाकण्यात आले. तर ही कारवाई म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीचा एक कट असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते शांतनू सेन यांनी केला आहे. स्वत:च्या निवासस्थानी इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम का ठेवली गेली होती हे सिन्हा यांना स्पष्ट करता आलेले नाही. आम्ही तपासाच्या संबंधात संपत्तीशी निगडित काही दस्तऐवज जप्त केले आहेत. एक मोबाइल फोन आणि 40 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच मंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत असे ईडीच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. छाप्याच्या कारवाईवेळी सिन्हा बोलपूरपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावरील मुरारई येथील स्वत:च्या मूळ घरी होते. यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सिन्हा ांना बोलपूर येथे परत येण्याची सूचना केली आणि तेथे त्यांची अनेक तासापर्यंत चौकशी करण्यात आली आहे.
14 तासांपर्यंत चालली कारवाई
ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी झडतीवेळी मंत्र्याच्या घरी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक दस्तऐवज दाखविले आहेत. त्यानंतर पोलिसांना निवासस्थानाबाहेर ठेवण्यात आले होते. ईडीच्या पथकात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. ही कारवाई सुमारे 14 तासांपर्यंत सुरू राहिली होती.
Home महत्वाची बातमी पश्चिम बंगालच्या मंत्र्यांवर ईडीचे छापे
पश्चिम बंगालच्या मंत्र्यांवर ईडीचे छापे
40 लाख रोख रक्कम जप्त वृत्तसंस्था/ कोलकाता ईडीने बंगालच्या एका मंत्र्याच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. ईडीने शुक्रवारी ममता बॅनर्जी सरकारमध्ये लघू आणि कुटिरोद्योग मंत्री चंद्रनाथ सिन्हा यांच्या बोलपूर स्थित निवासस्थानी झडती घेतली आहे. शुक्रवारी रात्री ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक सिन्हा यांच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी राज्याचे मंत्री निवासस्थानी हजर नव्हते. ईडीच्या पथकाने 14 तासांपर्यंत चाललेल्या […]