केजरीवालांना ईडीकडून सहाव्यांदा समन्स जारी

19 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सुरू असलेल्या तपासात सामील होण्यासाठी नवीन समन्स बजावले आहे. या समन्सनुसार सोमवार, 19 फेब्रुवारीला त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. यापूर्वीही ईडीने त्यांना पाचवेळा समन्स बजावली असून त्याकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले होते. ईडीने […]

केजरीवालांना ईडीकडून सहाव्यांदा समन्स जारी

19 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सुरू असलेल्या तपासात सामील होण्यासाठी नवीन समन्स बजावले आहे. या समन्सनुसार सोमवार, 19 फेब्रुवारीला त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. यापूर्वीही ईडीने त्यांना पाचवेळा समन्स बजावली असून त्याकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले होते.
ईडीने 2 फेब्रुवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना समन्स पाठवले होते. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अद्याप ईडीसमोर हजर झालेले नाहीत. केजरीवाल समन्सकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ईडीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने केजरीवाल यांना नोटीस पाठवली असून त्यांना 17 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात केंद्रीय एजन्सीच्या समन्सचे पालन न केल्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पाच समन्स पाठवले मात्र केजरीवाल हजर झाले नाहीत. त्यानंतर तपास यंत्रणेने न्यायालयात धाव घेतली. तत्पूर्वी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांच्यासमोर हजर होऊन ईडीच्या वतीने युक्तिवाद केला होता.