राजस्थान-मध्यप्रदेशात उष्मालाटेचा इशारा
दिल्लीत तापमान 47 अंशावर : कोटा येथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू : पंजाबमध्ये शाळांना सुटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात तीव्र उष्णतेसोबत आता उष्मालाटेचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशात 4 दिवसांसाठी उष्मालाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरच्या जम्मू विभागात उष्ण वारे वाहण्याचा इशारा आहे. या राज्यांमध्ये आगामी 4-5 दिवसांपर्यंत तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
याचबरोबर उष्मालाटेचा इशारा देण्यात आलेल्या राज्यांमध्ये तापमान 44-47 अंशादरम्यान राहिले आहे. दिल्लीच्या नजफगढमध्ये सोमवारी तापमान 47.4 अंश इतके नोंदले गेले. रविवारी तापमान 48 अंशानजीक पोहोचले होते. उष्णतेमुळे पंजाबच्या शाळांमध्ये मंगळवारपासून उन्हाळी सुटीची घोषणा करण्यात आली आहे. तर हिमाचल, जम्मूमध्ये शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. दिल्लीतही शाळा त्वरित बंद करण्यास सांगण्यात आले आहे.
केरळ-तामिळनाडूत अतिवृष्टी
दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडू ही राज्ये मान्सूनच्या आगमनापूर्वीच पावसामुळे बेहाल झाली आहेत. हवामान विभागाने दोन्ही राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. तेथील सखल भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये पावसामुळे भूस्खलन आणि आजार फैलावण्याची भीती पाहता आपत्कालीन सेवांना सतर्क करण्यात आले आहे. केरळमध्ये सोमवारी मोठा पाऊल पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
22 मे : कर्नाटकसह 5 राज्यांमध्ये पावसाचे अनुमान
पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशामध्ये उष्मालाटेचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप, निकोबार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.
23 मे : 6 राज्यांमध्ये जोरदार वारे शक्य
बिहार, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल येथे जोरदार वारे वाहण्याचे अनुमान आहे. राजस्थानच्या पूर्व भागांमध्ये रात्री तापमान वाढणार असून तेथे उष्मालाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशात उष्मालाटेचा इशारा देण्यात आला आहे.
24 मे : 6 राज्यांमध्ये पाऊस पडणार
उत्तर प्रदेश आणि राजस्थानात रात्रीच्या वेळी तीव्र उष्णता जाणवण्याचा अंदाज आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये उष्मालाट राहू शकते. केरळ आणि पश्चिम बंगालच्या किनारी शहरांमध्ये 40 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहतील. पश्चिम बंगाल, ओडिशा, अंदमान आणि निकोबार, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये 48 तासांत 200 मिमी पाऊस
हवामान विभागाने केरळच्या 4 जिल्ह्यांसोबत तिरुअनंतपुरम आणि दक्षिण तामिळनाडूच्या किनारी भागात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. स्कायमेटनुसार राजधानी तिरुअनंतपुरममध्ये मागील 48 तासांमध्ये 200 मिलिलीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. कोझिकोडमध्ये मागील 24 तासांमध्ये 116 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागानुसार पुढील 3 दिवसांमध्ये केरळमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर 30-40 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याचा इशारा विभागाने जारी केला आहे.
Home महत्वाची बातमी राजस्थान-मध्यप्रदेशात उष्मालाटेचा इशारा
राजस्थान-मध्यप्रदेशात उष्मालाटेचा इशारा
दिल्लीत तापमान 47 अंशावर : कोटा येथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू : पंजाबमध्ये शाळांना सुटी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशात तीव्र उष्णतेसोबत आता उष्मालाटेचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशात 4 दिवसांसाठी उष्मालाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरच्या जम्मू विभागात उष्ण वारे वाहण्याचा […]